Tokyo Olympics 2020 : पराभव, विजय हे जीवनाचाच भाग; सेमीफायनल्समधील पराभवानंतर मोदींकडून हॉकी संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप
Tokyo Olympics 2020 : वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमनं मंगळवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आलेल्या पुरुष हॉकी सामन्यात भारताचा 5-2 अशा फरकानं पराभव केला.
![Tokyo Olympics 2020 : पराभव, विजय हे जीवनाचाच भाग; सेमीफायनल्समधील पराभवानंतर मोदींकडून हॉकी संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप Tokyo Olympics 2020 pm modi said on the defeat of the hockey team victory is part of life the country is proud of the players Tokyo Olympics 2020 : पराभव, विजय हे जीवनाचाच भाग; सेमीफायनल्समधील पराभवानंतर मोदींकडून हॉकी संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/30/3e0a595a5638f7ab8687e8a29b1d622e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक सेमीफायनल्समध्ये भारतीय हॉकी संघाचा 5-2 अशा फरकानं पराभव झाला. या पराभवासह भारताचं फायनल्स गाठण्याचं स्वप्न भंगलं. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचं कौतुक करत त्यांचं मनोबल उंचावलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पराभूत होणं किंवा विजय मिळवणं हा खेळाचा भाग आहे. पुढे बोलताना ते हेदेखील म्हणाले की, देशाला सर्व खेळाडूंवर गर्व आहे. दरम्यान, भारतीय संघाच फायनल्स गाठण्याचं स्वप्न भंगलं असलं तरिही, कांस्य पदकासाठी भारतीय संघ दुसऱ्या सेमी फायनल्समध्ये पराभव झालेल्या संघासोबत लढणार आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं की, "पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा आहे. टोकियो 2020 मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघानं आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे."
यापूर्वीच्या सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत सांगितलं होतं की, ते सुद्धा सामना पाहत आहेत. त्यासोबतच त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "मी भारत आणि बेल्जियम याच्यातील हॉकी पुरुष सेमीफायन्सचा सामना पाहतोय. आम्हाला आमचा संघ आणि त्यांच्या कौशल्यावर गर्व आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा!"
फायनल्स गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं; बेल्जियमचा 5-2 नं विजय
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात भारतानं दोन गोल डागले, तर बेल्जियमनं पाच गोल डागत भारतावर मात केली. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचं फायनल्स गाठण्याचं स्वप्न भंगलं असून बेल्जियमनं फायनल्समध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदक आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला असला तरी अद्यापही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात विजयी संघ फायनल्समध्ये खेळणार, तर पराभूत झालेला संघाचा सामना कांस्य पदकासाठी भारतासोबत होणार आहे.
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये अगदी सुरुवातीलाच बेल्जियमनं एक गोल डागत आघाडी घेतली होती. पण भारतानं हे आव्हान संपुष्टात आणत बेल्जियमच्या एका गोलच्या बदल्यात दोन गोल करत आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मात्र वर्ल्ड चॅम्पियन असलेला बेल्जियमच्या संघानं एकही संधी दिली नाही. संपूर्ण सामन्यात बेल्जियमला 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी तीन पेनल्टी कॉर्नवर गोल डागण्यात ते यशस्वी झाले.
सेमीफायनल्स सामन्याचा दुसरा क्वार्टरही अत्यंत रोमांचक होता. यामध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. दरम्यान, संघाला या पेनल्टी कॉर्नवर गोल डागता आला नाही. सामन्याच्या चौथ्य क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हेड्रिंक्सनं आणखी एक गोल डागला. या गोलसह बेल्जियमन भारतावर 5-2 अशा फरकानं विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)