PAN-Aadhaar : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस; लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा...
1 एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
PAN-Aadhaar : तुमचं पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करण्याचा आजचा (31 मार्च) हा शेवटचा दिवस आहे. 1 एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही हे आज करु शकला नाहीत तर उद्या म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळं आता शेवटचे काही तास उरले आहेत. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आधार पॅन कार्डला लिंक केले नाही त्यांनी आज दिवसभरात ते लिंक करुन घेणे गरजेचं आहे.
दरम्यान, यापूर्वी कितीतरी वेळा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढी दिली होती. जवळपास 5 वर्षांपूर्वीच पहिल्यांदा आधार पॅनला पॅन लिंक करण्यास सुचवले होते. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. मात्र त्यानंतरही तुम्ही दंड भरुन आधार आणि पॅन कार्ड लिंक करु शकता. सीबीडीटीने एक अधिसूचना जारी करुन म्हटले आहे की, 31 मार्चनंतरही आधार आणि पॅन लिंक करता येईल, मात्र त्यानंतर दंड भरावा लागेल.
31 मार्चनंतर किती दंड भरावा लागेल
नोटिफिकेशननुसार, 31 मार्चनंतर 3 महिन्यांच्या आत आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल. तसेच आधार आणि पॅन कार्ड 3 महिने म्हणजेच जूनपर्यंत लिंक न केल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल.
असे करा पॅन आणि आधार ऑनलाइन लिंक
1. पॅन-आधार (Aadhaar-PAN) लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
2. साइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला Quick Links चा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. येथे तुम्हाला तुमचा पॅन (PAN), आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल.
4. ही माहिती दिल्यानंतर, तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर, तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल.
'या' लोकांना पॅन-आधार लिंक करण्यापासून सूट
ज्यांच्याकडे आधार कार्ड किंवा त्याचा नावनोंदणीचे ओळखपत्र नाही त्यांना सध्या या नियमातून सूट देण्यात आली आहे.
मेघालय, जम्मू आणि काश्मीर आणि आसाम तसेच केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी
ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांनाही या नियमातून सूट देण्यात आली आहे.
भारताचे नागरिकत्व नसलेल्यांना पॅन-आधार लिंक बंधनकारक नाही
अनिवासी आयकर कायदा 1961 नुसार सूट मिळालेल्या नागरिकांना पॅन-आधार लिंक करणे आवश्यक नाही.
दरम्यान, आजचा दिवस आधार पॅन कार्ड लिंकिंगचा शेवटचा आहे. जे भारतीय त्यांचे आधार-पॅन लिंक करू शकणार नाहीत. त्यांना Finance Bill, 2021 अन्वये एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सप्टेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने आधारला घटनात्मक वैध म्हणून घोषीत केले होते. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि पॅन कार्ड वाटपासाठी बायोमेट्रिक आयडी म्हणून आधार अनिवार्य कागदपत्र राहील असे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या: