एक्स्प्लोर

13 January In History: भारतात पोलिओचा अखेरचा रुग्ण, इटलीमध्ये भूकंप, इतिहासात आज

Din Visesh: 13 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा आणि अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला

On This Day In History:  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 13 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा आणि अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आहे. मिकी माऊस चित्राच्या रुपात आले होतं तर आजच्याच दिवशी भारतात पोलिओचा अखेरचा रुग्ण आढळला होता.. त्याशिवाय इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म (Pandit Shivkumar Sharma)
जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचा आजच्याच दिवशी म्हणजे १३ जानेवारी १९३८ मध्ये जन्म झाला होता. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख आहे. 10 मे 2022 रोजी हार्ट अॅटकच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित शिवकुमार शर्मा  यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेय. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं.  शास्त्रीय संगीतावर आधारित अल्बम 'कॉल ऑफ द व्हॅली', रोमँटिक ड्रामा फिल्म 'सिलसिला' आणि 'चांदनी'साठी त्यांना 'प्लॅटिनम डिस्क' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1985 मध्ये त्यांना अमेरिकेतील बाल्टिमोर शहराचे मानद नागरिकत्व बहाल करण्यात आलेय. 

1949 - राकेश शर्मा यांचा जन्म (Rakesh Sharma)
भारताच्या अवकाश संशोधनाचा विषय निघाला की,  कल्पना चावला आणि राकेश शर्मा यांची नावं हमखास निघतात. राकेश शर्मा अंतरिक्षात जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. त्यांचा आजच्याच दिवशी १९४९ मध्ये जन्म झाला आहे.  २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमेअंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली होती. यासह ते भारताचे पहिले तर जगातील अंतराळवीर ठरले.

1966 - मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस (Mumbai–Pune Shatabdi Express) 
आजच्याच दिवशी १९६६ मध्ये मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली होती. प्रवासी कमी असल्यामुळे २००६ मध्ये ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याजागी मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी गाडी सुरु करण्यात आली. शताब्दी एक्सप्रेस संपूर्ण वातानुकूलीत होती. त्यामुळे प्रवाशांची संख्या खूप कमी होती. परिणामी ही गाडी बंद करण्यात आली.  या गाडीच्या जागी आज मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस धावते.  

1930 - मिकी माऊस चित्राच्या रुपात (Mickey Mouse) 
मिकी माऊस हा प्रथम चित्र रुपात आणि कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आजच्याच दिवशी १९३० मध्ये आला होता. सशापासून उंदरापर्यंत वाल्ट डिस्ने यांनी पहिले ओसवॉल्ड सशाचे पात्र रंगवले होते. परंतु युनिव्हर्सल स्टुडिओने त्यांच्याकडून हे पात्र हिसकावून घेतले. तेव्हा वॉल्टने मिकी माऊस तयार केला. १९३० मध्ये हे पात्र प्रथम चित्र रुपात लोकांच्या समोर आलं. आजही मिकी माऊस अबालवृद्धांची मने रिझवत आहे.

भारतातील पोलिओचा शेवटचा रुग्ण  (india last polio case)
आजच्याच दिवशी म्हणजे, 13 जानेवारी, 2011 रोजी हावडा येथे देशातला शेवटचा पोलिओ रूग्ण सापडल्याची नोंद आहे. जगभरातील पोलिओ रुग्णांपैकी  भारतामध्ये पोलिओचे 60 टक्के रुग्ण होते. पण केंद्र सरकारने देशभरात पोलिओसाठी अभियान राबवलं.. त्यासह अनेक योजनाही आणल्या.. परिणाम देशातून पोलिओ हद्दपार झाला... आजही देशभरात बाळाला पोलिओचा डोस दिला जातो.

1915: इटलीतील अवेझानो भूकंप, तीस हजार जणांचा मृत्यू (Avezzano earthquake) 
इटलीतील अवेझानो येथे १३ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. जवळपास सात रेश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या भूकंपामध्ये जवळपास तीस हजार जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल ६० मिलिअन डॉलरचं नुकसान झालं होतं. या भूकंपामुळे अनेकजण रस्त्यावर आली होती. कुणी आई, तर कुणी बापाला गमावलं होतं. तर कुणाचा मुलगा तर कुणीची मुलगी मृत झाली होती. या भूकंपाच्या आठवणी आजही इटलीतील लोकांसाठी ताज्या असतील. 

पश्चिम बंगालमध्ये दंगल, १०० जणांचा मृत्यू 
आजच्याच दिवशी १९६४ मध्ये पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये दोन समाजामध्ये दंगल झाली होती. या दंगलीमध्ये शंभर जणांचा मृत्यू झाला होता तर चारशे जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल सातशे जणांना अटक केलं होतं. तर तब्बल ५५ हजार जण लष्कराच्या शिबिरात वास्तव्यास होते.  

इतर महत्वाच्या घडामोडी -
1559: एलिझाबेथ यांची पहिल्या इंग्लंडच्या राणीपदी नियुक्ती  
1610:  प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलिस्टो याचा शोध लावला. 
1899 : गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला
 1942:   जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेनं कारगृहात पाठवायला सुरूवात केली.
 1983 : भारतीय अभिनेते इम्रान खान यांचा जन्म 
 2007: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे 37 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
2011 : मराठी अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
Embed widget