एक्स्प्लोर

28 December In History : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म; आज इतिहासात 

28 December In History : आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. याबरोबरच भारतीय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी  झाला. 

On This Day In History : इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं असतं. इतिहासात प्रत्येक दिवशी काही ना काही महत्वाचं घडलेलं असतं. 28 डिसेंबरचा दिवस देखील देशाच्या आणि जगाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. याच दिवशी मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन देखील पार पडले. याबरोबरच देशाची राजधानी दिल्लीच्या निवडणूक इतिहासात 28 डिसेंबर ही तारीख एका मोठ्या ट्विस्टने नोंदवली गेली आहे. आजच्या दिवशी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) काँग्रेसच्या मदतीने दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केले. याबरोबरच आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 1885 : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना  (Indian National Congress)

आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. याच दिवशी मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन देखील पार पडले. काँग्रेसच्या स्थापनेत एका माजी ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याची मोठी भूमिका घेतली होती. त्यांचं नाव होतं ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूम. ते काँग्रेस स्थापनेसाठी बोलावलेल्या अधिवेशनाचे आयोजक होते. पुढं ह्यूम यांनी काँग्रेसचे महासचिव म्हणून अनेक वर्षं काम केलं. 

1885 साली पुण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचं ठरलं होतं. परंतु, पुण्यात प्लेगची साथ आल्याने काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला हलवण्यात आले. स्थापनेच्या वेळी काँग्रसचा उद्देश नमूद करण्यात आला होता. त्यानुसार सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा. भारतीय आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा, अशी घोषणा करण्यात आली होती. 

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते. तर फिरोजशाह मेहता, सुरेन्द्रनाथ बनर्जी, रोमेश चंद्र दत्त, बद्रुद्दीन तयबजी, एस. सुब्रमण्यम अय्यर आणि इतर नेत्यांचा पहिल्या अधिवेशनात समावेश होता. यातले बहुतेक नेते हे बंगाल आणि बाँबे प्रांतातले होते. मुंबईतील गवालिया टँक जवळच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. 

 1926 : हुतात्मा शिरीष कुमार यांचा जन्म  (Shirishkumar Mehta)

शिरीष कुमार यांचा जन्म  28 डिसेंबर 1926 रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले. 1942 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले. शिरीषकुमार नंदुरबारमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करीत होते. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरीकेड उभारले होते. जसजशी मिरवणूक गाठली त्याप्रमाणे पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज लावला. शिरीषकुमारकडे तिरंगा, भारतीय राष्ट्रध्वज होता. त्यांच्या लाठीचा आरोप मिरवणूक थांबवू शकले नाही तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत शिरीशकुमार हुतात्मा झाले. त्याचबरोबर धनसुखलाल वणी, घनश्याम दास, शशीधर केतकर आणि लालदास यांचाही याच जागेवर मृत्यू झाला.

1928 : मेलडी ऑफ लव्ह चित्रपट  प्रदर्शित

आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1928 रोजी मेलडी ऑफ लव्ह हा बोलला चित्रपट कोलकातामध्ये प्रथम प्रदर्शित करण्यात आला. 

 1937 :  भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म (Ratan Tata)
 

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी  झाला. टाटा समुहाचे अध्यक्ष राहिलेल्या रतन टाटा यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांना नवजाबाई टाटा यांनी त्यांचे पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर दत्तक घेतले होते. रतन टाटा यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतले आणि माध्यमिक शिक्षण कॅथेड्रलमधूनच घेतले. त्यानंतर त्यांनी जॉन कॅनन कॉलेजमधून आर्किटेक्चरमध्ये बीएससी केले. त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठातून 1962 मध्ये कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमचे शिक्षण घेतले. रतन टाटा 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले पण तरीही ते टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.  

1940 :  भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म (A. K. Antony)

ए. के. अँटनी हे भारतीय राजकारणी आहेत. ते केरळचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. याबरोबरच ते पाच वेळा राज्यसभेवर निवडून आले असून चार वेळा विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी जवळपास एक दशक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. या पदावर ते सर्वात जास्त काळ काम करणारे मंत्री आहेत.

1952 : भारतीय नेते अरुण जेटली यांचा जन्म (Arun Jaitley )

 अरुण जेटली यांजा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. जेटली हे भाजपचे नेते, भारताचे अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री होते. याबरोबरच त्यांनी इतर अनेक महत्त्वाची पदे सांभाळली.  24 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचे निधन झाले. 

1974 : पाकिस्थानात भीषण भूकंप

आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1974 रोजी पाकिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात 5200 पेक्षा जास्त अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

1995 : मार्के कार्मिंस्की यांनी  उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर एकाच दिवशी ध्वज फडकवला 

पोलिश संशोधक मार्के कार्मिंस्की यांनी आजच्या दिवशी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर झेंडा फडकवला.  एकाच दिवशी ध्वज फडकवणारे ते पहिले व्यक्ती ठरले.

2003 :  अमेरिकेत काही ब्रिटिश विमानांमध्ये स्काय मार्शल म्हणजेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले

आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 2003 रोजी अमेरिकेत काही ब्रिटिश विमानांमध्ये स्काय मार्शल म्हणजेच सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

2008 :  कवी आणि लेखक प्रा. सुरेश वात्स्यायन यांचे निधन 

भारताचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी आणि लेखक प्रा. सुरेश वात्स्यायन यांचे 28 डिसेंबर 2008 रोजी निधन झाले. 

2013 : आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या पाठिंब्याने दिल्लीत सरकार स्थापन केले (Aam Aadmi Party)

देशाची राजधानी दिल्लीच्या निवडणूक इतिहासात 28 डिसेंबर ही तारीख एका मोठ्या ट्विस्टने नोंदवली गेली आहे. आजच्या दिवशी आम आदमी पक्षाने (आप) काँग्रेसच्या मदतीने दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केले.  

अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून बाहेर पडलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेत नशीब आजमावले आणि 28 जागा जिंकून सर्व राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकीचे ठरवले. या निवडणुकीत आठ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

व्हिडीओ

Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Pune Election 2026 BJP VS NCP: भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
Amit Deshmukh: भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
Akola crime Hidayat Patel: काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
Embed widget