एक्स्प्लोर
हॉटेलमध्ये शिरण्याआधी बिलासंदर्भातील 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा
मुंबई : ज्या ग्राहकांना हॉटेलमध्ये समाधानकारक सेवा मिळाली नसेल, त्यांना सर्व्हिस चार्जच्या नावाखाली आकारले जाणारे पैसे देणं बंधनकारक नसेल. सर्व्हिस चार्ज द्यायचा की नाही हा पूर्णपणे ग्राहकांचा ऐच्छिक निर्णय असेल, असा आदेश सरकारने दिला आहे. हॉटेलने सर्व्हिस चार्जसाठी दबाव आणल्यास ग्राहक संरक्षण कायद्याखाली हॉटेलवर कारवाई केली जाईल.
हॉटेलमधील बिलासंदर्भात काही गोष्टी सर्व ग्राहकांना माहिती असायला हव्यात. त्यातील अत्यंत महत्त्वाच्या तीन गोष्टी खालीलप्रमाणे :
सर्व्हिस टॅक्स : सर्व्हिस टॅक्स हा सर्व्हिस देणाऱ्याने सरकारला द्यावा लागणारा टॅक्स आहे. मात्र, अनेकदा काय होतं की, सर्व्हिस पुरवणारे हा टॅक्स स्वत:च्या खिशातून न देता ग्राहकांच्या बिलातून आकारतात. सर्व्हिस टॅक्स केंद्र सरकारकडून आकारला जातो. आजच्या घडीला एकूण 15 टक्के सर्व्हिस टॅक्स आकारला जातो, त्यामध्ये 0.5 टक्के कृषी कल्याण टॅक्स आणि 5 टक्के स्वच्छ भारत टॅक्सचाही समावेश आहे. त्यामुळे हॉटेलमधील बिल भरत असताना त्यामध्ये सर्व्हिस टॅक्सच आहे ना, ते तपासून पाहा. कारण सर्व्हिस टॅक्स आणि सर्व्हिस चार्ज हे दोन वेगळे आहेत.
सर्व्हिस चार्ज : तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर सर्व्हिस चांगली दिल्याने वेटरला टिप देता का?... देता ना... तर ती टिप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्व्हिस चार्जचाच प्रकार आहे. पण काही हॉटेलमध्ये हॉटेल चालणारे ग्राहकांच्या बिलातूनच सर्व्हिस चार्ज आकारतात. सर्व्हिस चार्ज बिलाच्या 5 ते 20 टक्के इतके असतं. बिलातच सर्व्हिस चार्ज आकारल्याने ग्राहकांना अर्थातच भरावं लागत होतं. अनेक ग्राहक सर्व्हिस चार्ज भरुन, वर पुन्हा वेटरला टिपही देत असत. हे सारं गौडबंगाल लक्षात घेऊन सरकारने सर्व्हिस चार्ज देणं ऐच्छिक केलं आहे. त्यामुळे यापुढे सर्व्हिस चार्ज द्यायचा की नाही हा पूर्णपणे ग्राहकांचा ऐच्छिक निर्णय असेल
व्हॅट : व्हॅट (व्हॅल्यू अॅडेड टॅक्स) राज्या-राज्यात वेगळा असतो. प्रत्येक राज्य व्हॅट किती लावायचा हे ठरवतो. पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थ, पेय इत्यादी गोष्टींवर राज्य सरकारकडून व्हॅट आकरला जातो. मात्र, जे पदार्थ हॉटेलमध्ये बनवलेले नाहीत, त्यांच्यावर व्हॅट आकारले जाऊ शकत नाही. उदाहर्णार्थ - कोको कोलाच्या बॉटलवर हॉटेलकडून व्हॅट आकारला जाऊ शकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement