Mujahideen Terrorists Killed : सुरक्षा दलाचं मोठं यश, हिजबुल कमांडर अशरफ मौलवीसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Anantnag Encounter : काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, पहलगामच्या अशरम मौलवीसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अशरफ मौलवी हा हिजबुल काश्मीर कमांडर होता
Anantnag Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये (South Kashmir) एका ऑपरेशनमध्ये हिजबुल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen) चे कमांडर अशरफ मौलवीला (Ashraf Maulvi) ठार मारण्यात आले आहे. या दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यानंतर सुरक्षदलाला दहशतवादी विरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. तर दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्हातील पहलगमच्या बटकूट परिसरतील जंगलात झालेल्या चकमकीत दोन साथीदारांना ठार मारण्यात आले आहे.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, पहलगाममध्ये अशरफ मौलवीसह दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. अशरफ मोलवी हिजबुलचा काश्मीरचा कमांडर होता. 6 मे 2020 साली रियाज नाइकूच्या हत्येनंतर मौलवीला कमांडर बनवण्यात आले.
3 Hizbul Mujahideen terrorists killed in encounter with security forces near Amarnath Yatra route in Anantnag district of Jammu and Kashmir: Police
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2022
हिजबुलमध्ये कधी सहभागी झाला अशरफ?
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील तेंगपाव कोकरनाग परिसरातील रहिवासी मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी 2013 साली हिजबुलमध्ये सहभागी झाला. सहभागी झाल्यानंतर लगेचच मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये सहभागी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांना अशरफ हिजबुलमध्ये सहभागी होण्यासाठी फूस लावत असे.
बटकूटमध्ये त्याची माहिती मिळताच पोलीस आणि सेनेची एक 19RR अशी टीम बनवण्यात आली. त्यानंतर या टीमने बटकूट जंगलात शोध घेण्यास सुरूवात केली. जशी या संयुक्त दलाने जंगलात शोध मोहीम सुरू केली लगेच दहशतवाद्यांनी टीमवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या चकमकीत सेनेने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
किती रुपयांचे होते बक्षीस?
सध्या काश्मीरच्या घाटीमध्ये हिजबुलचा कोणीही कमांडर नाही. मौलवी बुरहानचा वानीच्या वेळी जारी केलेल्या यादीत त्याचा समावेश होता. सध्या पोलिसांच्या मोस्ट वॉंटेड लिस्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. या दहशतवाद्यावर दहा लाखांचे बक्षीस होते.