'या' राज्यात आहे देशातील सर्वाधिक सोन्याचा साठा, जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालातून माहिती आली समोर
Gold Reserves In India: देशात सर्वाधिक सोन्याचा साथ कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल.
Gold Reserves In India: देशात सर्वाधिक सोन्याचा साथ कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल. ज्या राज्यात सर्वाधिक सोने असेल तेच राज्य सर्वात श्रीमंत असेल, असेही तुम्ही गृहीत धरत असाल. मात्र असं नाही आहे. अलीकडेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (GSI) गोल्ड रिझव्र्ह (Gold Reserve) संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात असे आढळून आले की, देशातील एकूण सोन्यापैकी 44 टक्के सोने फक्त बिहारमध्ये आहे. हे प्रमाण 222.8 दशलक्ष टन किंवा 2230 लाख टन इतके असू शकते. आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे बिहारच्या जमुई जिल्ह्यात सर्वाधिक 27.6 टन सोन्याचा साठा आहे. एका आकडेवारीनुसार, देशात 500 दशलक्ष टन (सुमारे 5000 लाख टन) सोन्याचा साठा आहे, त्यापैकी 44% बिहारमध्ये आहे.
जीएसआय सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा जमुई, बिहारमध्ये आहे. मात्र श्रीमंतीच्या यादीत या राज्याचे नाव खाली दिसते. या सर्वेक्षणानंतर बिहार सरकार सक्रिय झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जमुई गोल्ड रिझर्व्हच्या खाणकामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून येथे किती सोने जमिनीखाली दडले आहे ते कळेल.
जमुईचे काही खास क्षेत्र आहेत जिथे सोन्याचे साठे आहेत. जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो या भागात सोने मुबलक प्रमाणात जमीनीखाली असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर शासनस्तरावर विचारविनिमय सुरू झाला आहे. खाणीतून सोने काढण्याची तयारी सुरू आहे. 'पीटीआय' मधील एका वृत्तात म्हटले आहे की, जीएसआयकडून माहिती मिळाल्यानंतर बिहारच्या खाण विभागाने खाणीतून सोने काढण्याचे काम करणाऱ्या एजन्सींशी चर्चा सुरू केली आहे. खाण विभाग GSI आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ म्हणजेच NMDC च्या संपर्कात आहे. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाणकाम सुरू करण्यात येणार आहे. खाण आयुक्त हरजोत कौर बुमराह यांनीही याला दुजोरा दिला आहे.