एक्स्प्लोर

देशात आजपासून हे पाच नियम बदलणार!

देशात आजपासून पाच मोठे बदल होणार आहेत. बँकेचे नियम, ईटीसी प्रणालीची सुरुवात आणि मोबाईल बिल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशात आजपासून (1 ऑक्टोबर) पाच मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) खातेधारकांना खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या अटीमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून ईटीसी अर्थात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सुरु होणार आहे. एसबीआयकडून खातेधारकांना दिलासा एसबीआयने मेट्रो शहरांमध्ये खात्यात किमान रक्कम ठेवण्याची मर्यादा 5 हजारांहून 3 हजार रुपये केली आहे. यामुळे जवळपास 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल. शिवाय यावरील दंडाच्या रक्कमतेही कपात करण्यात आली आहे. यापूर्वी किमान रक्कम न ठेवल्यास 40 ते 100 रुपये वसूल केले जात होता. त्यावर सर्व्हिस टॅक्सही होता. मात्र आता ही मर्यादा 30 ते 50 रुपये करण्यात आली आहे. सततचा विरोध आणि सरकारच्या आवाहनानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला. एसबीआयने पेन्शन धारक, सरकारी योजनांचे लाभार्थी आणि अल्पवयीन खातेधारकांना किमान रक्कम ठेवण्याच्या मर्यादेतून बाहेर ठेवलं आहे. जुनं खातं बंद करण्यासाठी फी नाही एसबीआयमधील खातं बंद करण्यासाठी फी लागणार नाही. मात्र खातं एका वर्षापेक्षा अधिक दिवसांचं असणं गरजेचं आहे. एखादं खातं 14 दिवसांनंतर आणि एका वर्षाच्या आत बंद केल्यास 500 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. जुने चेक रद्द ज्या ग्राहकांकडे एसबीआयमध्ये मर्ज झालेल्या बँकांचे चेक आहेत, ते चेक यापुढे अमान्य करण्यात येतील. या बँकांचे जुने चेक आणि आयएफएससी कोड 30 सप्टेंबरनंतर चालणार नाहीत. राष्ट्रीय महामार्गांवर ईटीसी देशातील राष्ट्रीय महामार्गांवर आजापासून ईटीसी प्रणाली सुरु होणार आहे. तुमच्या गाडीवर आरएफआयडी असेल तर तुम्हाला टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. कॉल रेट स्वस्त होण्याची शक्यता तुमचं मोबाईल बिल आजपासून स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण ट्रायने नुकताच इंटरकनेक्शन चार्जचे दर (आययूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हा चार्ज 14 पैसे प्रती मिनिटांहून 6 पैसे प्रती मिनिट करण्यात आला आहे. आययूसी चार्ज म्हणजे काय? इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल जोडण्यासाठी आययूसी द्यावा लागतो. हा चार्ज सध्या 14 पैसे होता. मात्र आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी हा चार्ज वाढवण्याची मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती. आययूसीची सुरुवात 2003 साली करण्यात आली. इनकमिंग कॉल फ्री झाल्यानंतर ट्रायने कॉल करणाऱ्या ऑपरेटरकडून चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा चार्ज 15 पैसे प्रती मिनिट ते 50 पैसे प्रती मिनिट होता. ट्रायने 2004 साली हा दर घटवून 20 पैसे प्रती मिनिट केला, तर 2015 मध्ये हा दर 14 पैसे प्रती मिनिट करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget