हे आहेत भारतातील सर्वात चांगले नॉईज कॅन्सलेशन हेडफोन, संगीत ऐकण्याचा अनुभव होईल आणखी शानदार
नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्समुळे अनावश्यक आवाज कमी होतो.भारतात अनेक उत्तम प्रकारचे हेडफोन उपलब्ध
अनेकजनांना प्रवास करताना , काम करताना किंवा इतर काही गोष्टी करताना मोबाईलवर गाणी ऐकण्याची सवय असते किंवा मोबाईलवरुन संभाषण साधायचे असते. अशा वेळी त्यांना हेडफोन वापरावा लागतो. पण हेडफोन लावूनही सतत आजूबाजूचे आवाज ऐकू येतात आणि आपल्या संगीत ऐकण्याच्या कामात किंवा संभाषणात व्यत्यय येतो. मग अशा वेळी जर आजूबाजूचा आवाज कमी करुन केवळ संगीत ऐकता येत असेल किंवा संभाषण साधता आले तर? होय, अशा पध्दतीचे हेडफोन आता बाजारात आले आहेत जे अनावश्यक आवाज कमी करुन आपल्या संगीत ऐकण्याच्या अनुभवाला आणखी शानदार बनवू शकतात.
भारतात अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या अशा प्रकारचे हेडफोन तयार करत आहेत. या हेडफोनच्या किंमती 25 हजाराहून जास्त आहेत. चला तर मग बघूया भारतात सर्वात चांगले नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्स
आपण हेडफोन खरेदी करताना त्याची आवाजाची गुणवत्ता तपासून पाहतो. त्यात हेडफोनचा आणखी एक नवं फिचर आपल्याला अतिउत्तम आवाजाचा अनुभव देतो. जर आपण प्रवास करताना संगीत ऐकत असलो किंवा चित्रपट पाहत असलो तर अशा पध्दतीचा नॉईज कॅन्सलेशन हेडफोन असल्यास कोणतीही चिंता नाही. अशा प्रकारचे हेडफोन अनावश्यक असणारे आवाज आपल्यापर्यंत पोहचू देत नाही. भारतात या प्रकारचे नॉइज कॅन्सलेशन हेडफोन Sony आणि Bose या कंपन्या तयार करतात.
Shure AONIC 50 हा हेडफोन बाजारात उपलब्ध असणाऱ्या चांगल्या नॉइज कॅन्सलेशन हेडफोनपैकी एक आहे. ऐकताना आपल्याला स्टुडिओचा फिल येतो. हा हेडफोन क्वालकॉम च्या aptX HD आणि aptX लो लेटेंसी, सोनी च्या LDAC, आणि SBC सहित वायरलेस कोडॅक सिरीजला सपोर्ट करते. यात फिंगरटिप टच कंट्रोलची सोय आहे. यात नॉईज कॅन्सलेशनसाठी एनव्हायर मोड दिला आहे. भारतातील याची किंमत 34,999 इतकी आहे.
Sony WH-1000XM4 हा एक उच्च गुणवत्ता असलेला नॉइज कॅन्सलेशन हेडफोन आहे. सोनी कंपनीचा हा हेडफोन भारतातील सर्वात चांगला नॉइज कॅन्सलेशन हेडफोन आहे. सोनी कंपनीच्या इतर हेडफोनच्या गुणवत्तेप्रमाणे आहे. संगीताचा अत्युच्च अनुभव देणाऱ्या या हेडफोनची भारतातील किंमत ही 29,990 इतकी आहे.
Bose Noise Cancelling Headphones 700 या हेडफोनने आयकॉनिक क्विटकॉमफोर्टची जागा घेतली आहे. एक स्लीकर हेड बँड आणि कंटेंपररी ईयर कप डिजाइनसह हा हेडफोन उपलब्ध आहे. हा भारतातील एक सर्वात चांगली गुणवत्ता असलेला हेडफोन समजला जातो. याच्या आवाजाची गुणवत्ता ही उत्तम आहे. याची भारतातील किंमत 34,500 इतकी आहे.
संबंधीत बातम्या: