एक्स्प्लोर

लॉकडाऊनच्या काळातही तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवणारी 'ती' सहा नावं

मदर डेअरी, अमूल, अॅमेझॉन, एअरटेल, अर्बन क्लॅप, स्विगी, झोमॅटो यासारख्या उत्पादकांनी आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली आहे.

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान अचानक आवश्यक गोष्टी वगळता सर्व काही बंद झाल्याने एक मोठी समस्या निर्माण झाली. परंतु काही उत्पादकांनी आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली. यामध्ये मदर डेअरी, अमूल, अॅमेझॉन, एअरटेल, अर्बन क्लॅप, स्विगी, झोमॅटो आदींचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील आपलं सगळ सुरळीत सुरू आहे.

मदर डेअरी आणि अमूल

दूध संबंधित उत्पादनांच्या बाबतीत मदर डेअरी आणि अमूल या देशातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान त्यांना पूर्वीप्रमाणे वेळेवर काम करणे खूप अवघड होते. परंतु या कंपन्यांनी अशा कठीण परिस्थितीत देखील आपले काम व्यवस्थित सुरू ठेवले. अमूल आणि मदर डेअरी यांनी लॉकडाऊनमध्ये देखील ही काळजी घेतली की, लोकांना पूर्वीप्रमाणेच ताजे दूध आणि दूधापासून बनविलेले पनीर, तूप, बटर, चीज आदी पदार्थ लॉकडाऊन दरम्यान मिळत होते. दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन होते. परंतु या काळात देखील कंपन्यानी त्यांच्या ग्राहकांना पुरवठा केला

अॅमेझॉन

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात काही राज्यांमध्ये ई-कॉमर्स सेवांच्या डिलिव्हरींवर परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांनी सर्व सेवा खंडीत केली होती. राज्य सरकारने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाअंतर्गत किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची डिलिव्हरी करण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी देण्यात आली. या आश्वासनामुळे अॅमेझॉनने किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याची आपली सेवा पुन्हा सुरू केली. ग्राहक एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखत ई-कॉमर्स सेवा देत आहे. अॅमेझॉनने कर्मचारी, खासकरून डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह आणि ग्राहकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठा-साखळी बळकट केली.

एअरटेल

लॉकडाऊनच्या काळात देखील आपलं सगळ सुरळीत सुरू आहे. हे सगळ घरबसल्या आपल्याला शक्य आहे ते इंटरनेटमुळे. परंतु भारतातील सर्वात प्रसिद्ध मोबाइल नेटवर्क एअरटेलने या संकटाच्या काळातही आपल्या ग्राहकांची संपूर्ण काळजी घेतली आहे. एअरटेलने लॉकडाऊनमध्ये घरात बसलेल्या असंख्य लोकांना एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम केलं आहे. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या नातेवाईकांशी, मित्रांशी जोडले. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळात देखील एअरटेलने जास्तीत जास्त चांगली सेवा पुरवण्याच्या बाबीत अग्रेसर ठरलं आहे.

तसेच वर्क फ्रॉम होम चा पर्याय मिळालेल्या नोकरदारांना आपापले कार्यालयीन काम ऑनलाइन माध्यमातून करावे लागले. ही सर्व कामे विनाअडथळा करता यावी यासाठी एअरटेलने थँक्स अॅप आणले आहे. अॅपच्या माध्यमातून कोणतही मोबाईल रिचार्ज, डी.टी एच रिचार्ज घरबसल्या काही क्षणात करता आले. घरबसल्या रिचार्ज करणं एअरटेलमुळे सहज शक्य झालं आहे

  • एटीएम, पोस्ट ऑफिसमध्ये रिचार्जची सोय

एअरटेलने देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात सेवा पुरविल्या आहे. आजही आपल्या देशात असे अनेक नागरिक आहे की, जे रिचार्जसाठी आजही दुकानांवर अवलंबून आहेत. या ग्राहकांची गैसयोय होऊ नये यासाठी एअरटेलने लॉकडाऊनच्या काळात एटीएम, मेडिकल आणि पोस्ट ऑफिसवर देखील मोबाईल रिचार्जची सेवा उपलब्ध केली.

  • घरपोच सिमकार्डची सोय

लॉकडाऊन दरम्यान नवीन सिम कार्ड मिळविण्याचा कोणताही मार्ग नव्हता. परंतु एअरटेलने आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली. लॉकडाऊनमध्ये नवीन सिम कार्ड विकत घेण्यासाठी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी एअरटेलने घरपोच नवीन सिम कार्ड दिले.

  • इंटरनेट कनेक्शन लावले

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम चा पर्याय मिळालेल्या नोकरदारांना आपापले कार्यालयीन काम ऑनलाइन माध्यमातून करावे लागले.त्यामुळे इंटरनेटची मागणी वाढली. लॉकडाऊन दरम्यान एअरटेलने नवीन इंटरनेट कनेक्शनही दिले. इतकेच नाही, लॉकडाऊन दरम्यान एअरटेलचे जुन्या ग्राहकांना इंटरनेटची काही अडचण आली तर ती देखील सोडवली. एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी घरपोच सिम कार्ड, नवीन कनेक्शन देताना एकमेकांमध्ये फिजीकल डिस्टन्स राहील याची पूर्ण काळजी घेतली.

अर्बन क्लॅप

लॉकडाऊनची घोषणा उन्हाळ्यात करण्यात आली. लॉकडाऊनमुळे लोकांना एसी म्हणजेच एअर कंडिशनर सर्व्हिस घेण्याची संधीही मिळाली नाही. आपल्या ग्राहकांची हीच गरज लक्षात घेत अर्बन क्लॅपने लॉकडाऊन काळात देखील टेक्नीशियनच्या टीमने संपूर्ण काळजी घेत ग्राहकांच्या समस्या सोडवल्या.

झोमॅटो आणि स्विगी

देशात आॅनलाइन फूड मागविण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून फूड डिलिव्हरी क्षेत्राची प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये स्विगी आणि झोमॅटोची मोठी मदत झाली. ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील लॉकडाऊनच्या काळात केला आहे.

अपोलो फार्मसी

कोरोनामुळे मेडिकल स्टोअरमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घेणे खूप कठीण होते. परंतु अपोलो फार्मसीने या काळात देखील ग्राहकांना पूर्ण सेवा दिल्या. लॉकडाऊन दरम्यान, औषधांसह मास्क, सेनिटायझर्स आणि ग्लोव्हजची मागणी वाढली. अपोलो फार्मसीने स्टोअरमध्ये कोणत्याही सेवेची कमतरता येऊ दिली नाही तर सुरक्षिततेसाठी औषधे, हेड शिल्डआणि सॅनिटायझर्सच्या आवश्यक सुविधा देखील पुरविल्या. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी अपोलो फार्मसीने औषधांसह विनामूल्य मास्क आणि सॅनिटायझर दिले. कोरोनाविषयी नागरिकांना सजग करण्यासाठी अपोलोने म्हणून हात धुण्याची मोहीम एक कोटी लोकांपर्यंत पोहचविली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget