Punjab by elections 2022 : पंजाबमध्ये 'आप'ला तगडा हादरा, सीएम भगवंत मान यांचा बालेकिल्ला गमावला
Punjab by elections 2022 : पंजाबमध्ये भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या निवडणुकीत सिमरनजीत मान यांनी आप उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.
Punjab by elections 2022 : पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजीत मान यांनी विजय मिळवला आहे. आपचे नेते भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या निवडणुकीत सिमरनजीत मान यांनी आप उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7 हजारहून अधिक मतांनी पराभव केला. सांगरूर ही जागा भगवंत मान यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशा स्थितीत येथून पक्षाचा पराभव होणे ही मोठी बाब आहे. त्याकडे प्रदेशातील परिवर्तनाची लाट म्हणून पाहिले जात आहे.
लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यूपीच्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, तर आझमगडमध्येही विजय मिळवला आहे.
सिमरनजीत सिंह मान (77) हे शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1966 मध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तथापि, त्यांनी 18 जून 1984 रोजी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला. त्यांचे लग्न गीतंदर कौर मान (पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांची बहीण) यांच्याशी झाले आहे. ते 1989 मध्ये तरणतारणमधून आणि त्यानंतर 1999 मध्ये संगरूरमधून खासदार झाले. त्यांना सुमारे 30 वेळा अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, कधीही दोषी ठरविण्यात आले नाही.
सिमरनजीत सिंग मान यांना 1990 मध्ये कृपाण घालण्याचा आग्रह केल्यामुळे त्यांना संसदेत प्रवेश नाकारण्यात आला होता. पोटनिवडणुकीत मुस्लिमबहुल मालेरकोटला पट्ट्यात सिमरनजीत मान यांना 30,503 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर आपचे गुरमेल सिंग यांना 22,402 मते मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवार दलवीर सिंग गोल्डींना 13,030 मते, भाजपचे उमेदवार केवलसिंग ढिल्लन यांना 5,412 आणि बसपा उमेदवार कमलदीप कौर राजोआना यांना 35,73 मते मिळाली.
विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर
विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या जागांसाठी २३ जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये आप ने दिल्लीतील राजेंद्र नगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली आहे. झारखंडमधील मंदार मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- By-Elections Results 2022 : देशातील पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला, यूपीत सपाच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
- New Labour Code : देशात नवीन 4 लेबर कोड लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, ओव्हरटाईम, पीएफवर परिणाम होणार