(Source: ECI/ABP News/ABP Majha)
By-Elections Results 2022 : देशातील पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला, यूपीत सपाच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यूपीच्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, तर आझमगडमध्येही विजय मिळवला आहे.
by election 2022 : लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यूपीच्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, तर आझमगडमध्येही विजय मिळवला आहे. रामपूरमध्ये भाजपच्या घनश्याम लोधी यांनी सपा उमेदवार असीम राजा यांच्यावर ४२ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्याचवेळी, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, आझमगडमध्ये भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव निरहुआ आघाडीवर आहेत, तर सपाचे धर्मेंद्र यादव दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
रामपूरमध्ये सपाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम लोधी यांच्यात लढत होती. काँग्रेसने येथे निवडणूक लढवली नाही. दुसरीकडे, आझमगडमध्ये सपाचे धर्मेंद्र यादव, भाजपचे दिनेश लाल यादव निरहुआ आणि बसपचे शाह आलम उर्फ गुड्डू जमाली यांच्यात तिरंगी लढत होती.
पंजाबमधील संगरूर येथे शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे सिमरनजीत सिंग मान 5 हजार 822 मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग दुसऱ्या, तर काँग्रेसचे दलवीर गोल्डी तिसऱ्या स्थानावर राहिले. येथे अकाली दल आणि भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आझम खान यांच्या राजीनाम्यामुळे आझमगड आणि अखिलेश यांच्या राजीनाम्याने रामपूरची जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागा यापूर्वी एसपीच्या ताब्यात होत्या.
विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर
विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या जागांसाठी २३ जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये आप ने दिल्लीतील राजेंद्र नगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली आहे. झारखंडमधील मंदार मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.
पंजाब पोटनिवडणूक
भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा जागेवर आपने गुरमेल सिंग, काँग्रेस दलवीर सिंग गोल्डी आणि भाजपने केवल धिल्लन यांना उमेदवारी दिली होती. सिमरनजीत सिंग मान यांना अकाली दलाने (अमृतसर) उमेदवारी दिली होती.
विधानसभेच्या या 7 जागांवर पोटनिवडणूक झाली
दिल्ली-राजेंद्र नगर
AAP ने दुर्गेश पाठक, भाजपचे माजी नगरसेवक राजेश भाटिया आणि कॉंग्रेसच्या प्रेम लता यांना उमेदवारी दिली होती. ही जागा AAP चे राघव चड्ढा राज्यसभेवर निवडून आल्यानंतर रिक्त झाली होती. या जागेवर आपचे दुर्गेश पाठक 11हजार 468 मतांनी विजयी झाले आहेत.
त्रिपुरामध्ये 4 जागांसाठी निवडणूक
त्रिपुरामध्ये, आगरतळा, बोर्डोवाली टाउन आणि सूरमा येथील भाजप आमदारांनी राजीनामा दिला होता, तर जुबराजागरमधील सीपीआय(एम) आमदाराचे निधन झाले. बोरदोवली टाऊनमधून सीएम माणिक साहा यांनी काँग्रेसच्या आशिष कुमार साहा यांच्या विरोधात विजय मिळवला. माणिक 6 हजार 104 मतांनी विजयी झाले आहेत.
भाजपचे माजी आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी आगरतळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. जुबराजागर जागेवर भाजपच्या मलिना देबनाथ विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर सुरमा जागेवर भाजपच्या स्वप्ना दास विजयी झाल्या आहेत.
झारखंडमधील मंदार विधानसभा
रांची जिल्ह्यातील मंदार विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार शिल्पी नेहा तिर्की विजयी झाल्या असून भाजपच्या गंगोत्री कुजूर दुसऱ्या स्थानावर आहेत.
आंध्र प्रदेशमधील आत्मकुर विधानसभा
आंध्र प्रदेशातील आत्मकूर येथील काँग्रेस आमदार मेकापती गौतम रेड्डी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर वायएसआर काँग्रेसने त्यांचा भाऊ विक्रम रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. YSR काँग्रेसने ही जागा 82 हजार 888 मतांनी जिंकली आहे. त्याचवेळी भाजपचे जी भरतकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर राहिले.