Mobile Ban : मैत्री, प्रेम प्रकरण आणि प्रेम विवाहासाठी मोबाईल जबाबदार, गुजरातमध्ये ठाकोर समाजाने घेतला मोठा निर्णय
Mobile Ban for Girls : गुजरातमधील ठाकोर समाजाने मुलींना मोबाईलचा वापर करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Mobile Ban for Girls : मोबाईल फोनच्या (Mobile Phone) दुष्परिणामाबाबत अनेक चर्चा सुरू असतात. त्याचे सामाजिक परिणामाबाबतही चर्चा झडत असतात. आता, गुजरातमधील ठाकोर समुदायाने (Thakor community ) मोठा निर्णय घेतला आहे. ठाकोर समुदायाने परंपरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकोर समुदायाने मुलींना मोबाईलचा (Mobile Ban For Girls) वापर करण्यास बंदी घातली आहे. प्रेम प्रकरणे, मुलं-मुलींमध्ये मैत्री, आंतरजातीय विवाहाचा उल्लेख न करता अल्पवयीन मुलींवर मोबाईलमुळे वाईट परिणाम होत असल्याचा उल्लेख करत या बैठकीत मुलींना मोबाईल वापर बंदी करण्याचा प्रस्ताव मंजू करण्यात आला. या बैठकीत काँग्रेस आमदार वाव गेनीबेन ठाकोरदेखील उपस्थित होत्या.
बनासकांठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यातील लुनसेला गावात रविवारी, ठाकोर समाजाची बैठक पार पडली. ठाकोर समजाच्या बैठकीत विविध मुद्यावर ठराव करण्यात आले. समाजाच्या नियमात बदल करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
विवाह सोहळ्यात मोजकेच पाहुणे
साखरपुडा आणि लग्नाच्या समारंभात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. साखरपुडा अथवा विवाह सोहळ्यात 11 पाहुण्यांना आमंत्रित करण्याबाबत विचार करण्यास सूचवण्यात आले आहे. त्याशिवाय, ठाकोर समुदायातील लोकांची ज्या ठिकाणी संख्या अधिक असेल, त्या ठिकाणी सामूहिक विवाहाची व्यवस्था करायला हवी आणि लग्न, साखरपुड्यावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रित करण्याचा ठराव केला आहे. त्याशिवाय, कोणीही डीजेचा वापर करू नये असेही बैठकीत ठरवण्यात आले.
लग्न मोडल्यास दंड
साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबही निर्णय झाल्याचे वृत्त आहे. दंडातून जमा होणाऱ्या रक्कमेचा वापर हा शिक्षण आणि समाजासाठीच्या सुविधांच्या निर्मितीसाठी करण्यात यावा असे ठरवण्यात आले. समाजातील एखादी मुलगी उच्च शिक्षणासाठी शहरात जात असेल तर गावातील समाजाच्या लोकांनी तिच्या वाहतुकीसाठीची व्यवस्था करावी असेही ठरावात म्हटले आहे.
कुटुंबांवर समुदायाने दंड ठोठावला पाहिजे. दंड म्हणून गोळा केलेला निधी शिक्षण आणि समुदाय सुविधा तयार करण्यासाठी वापरला जावा. जर मुली उच्च शिक्षणासाठी शहरात जात असतील तर या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे गाव समुदायातील सदस्य त्यांच्यासाठी व्यवस्था करतात.