एक्स्प्लोर

Nikki Yadav Murder Case : तीन वर्षापूर्वी निक्की यादव आणि साहिलचं लग्न, लिव्ह इन सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्न; साहिलच्या वडीलांसह पाच जणांना अटक

Delhi Nikki Yadav Murder Case : निक्कीच्या हत्येत साहिलच्या कुटुंबाचा हात असल्याचा आरोप निक्कीचा वडिलांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी साहिलच्या वडिलांसह पाच जणांना अटक केली आहे.

Delhi Nikki Yadav Murder Case : दिल्लीतील निक्की यादव (Nikki Yadav) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मृत निक्की यादव आणि आरोपी साहिल गेहलोत (Sahil Gehlot) हे पती-पत्नी होते हे पोलीस तपासात उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निक्की आणि साहिल यांचं तीन वर्षापूर्वीचं लग्न झालं होतं. मात्र, साहिलने तपास भरकटवण्यासाठी या प्रकरणाला लिव्ह-इन सांगितल्याचं समोर आलं आहे. आता निक्कीच्या हत्येच्या आरोपाखाली साहिलच्या वडिलांसह पाच जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांच्या लग्नाचं प्रमाणपत्रही जप्त केलं आहे. निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवण्यात साहिलचा मित्र आणि चुलत भावाने देखील त्याला मदत केली होती.

साहिलच्या कुटुंबीयांनीच रचला निक्कीच्या हत्येचा कट

दिल्लीतील निक्की यादव या तरुणीची लिव्ह-इन पार्टनर साहिल गेहलोत याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांचं ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडा येथील आर्य समाज मंदिरात लग्न झालं होतं. साहिलचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात, त्यामुळे त्यांना निक्कीचा काटा काढायचा होता. म्हणून साहिलच्या कुटुंबियांनी डिसेंबर 2022 मध्ये साहिलचं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरवलं होतं आणि साहिलचं आधीच लग्न झाल्याचं त्या मुली आणि तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवले. 

साहिलच्या वडिलांसह पाच जणांना अटक

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही शनिवारी मोठी कारवाई करत निक्कीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी साहिलचे वडील, भाऊ आणि मित्रासह पाच जणांना अटक केली. क्राईम ब्रँचचे स्पेशल पोलीस आयुक्त रविंदर यादव यांनी सांगितलं की, साहिल गेहलोतची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की, निक्कीच्या हत्येचा संपूर्ण कट त्याच्या कुटुंबियांनी मिळून आखला होता. यामध्ये साहिलचे त्याचे वडील, दोन चुलत भाऊ आशिष आणि नवीन यांच्यासह अमर आणि लोकेश हे दोन मित्र सामील होते. हत्येनंतर सर्वजण साहिलच्या लग्नाला एकत्र पोहोचले होते. 

एक आरोपी पोलीस हवालदार

साहिल माहितीवरून इतर आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्यांच्यावर संशय आल्यानंतर साहिलच्या वडिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींमधील एक आशिष हा साहिलचा चुलत भाऊ असून तो दिल्ली पोलिसात हवालदार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

काय आहे निक्की यादव हत्या प्रकरण?

दिल्लीतील 22 वर्षीय तरुणी निक्की यादव हिची तिचा लिव्ह-इन पार्टनर याने हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून हत्येनंतर अवघ्या काही तासाने त्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न केलं. साहिल लग्न करणार असल्याचं समजताच निक्कीने त्याला याबाबत विचारलं. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. साहिलने निक्कीला फिरण्यासाठी बोलावलं आणि रागाच्या भरात गाडीतच मोबाईल केबलने गळा दाबून निक्कीची हत्या केली. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. तपासानंतर साहिलला अटक करण्यात आली होती. आता साहिल आणि निक्कीचं हे लिव्ह-इन पार्टनर नसून पती-पत्नी असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikki Yadav Murder Case: आधी गर्लफ्रेंडची हत्या, फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह अन् संध्याकाळी भतलीशीच बांधली लग्नगाठ; निक्की यादव हत्याकांडात धक्कादायक बाब उघड

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget