एक्स्प्लोर
जगाला हॅलो म्हण बाळा!, सानियाने बाळाचा पहिला फोटो शेअर केला
2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा विवाह झाला. त्यांना तब्बल आठ वर्षांनी मूल झाले. बाळाचे नाव या दोघांनीही इजहान मिर्झा मलिक असे ठेवले आहे.

नवी दिल्ली : टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांना 30 ऑक्टोबरला पुत्ररत्न प्राप्त झाले. या बाळाचा फोटो टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सानियाने पहिल्यांदाच मुलाचा फोटो शेअर केला आहे.
2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना तब्बल आठ वर्षांनी मूल झाले. बाळाचे नाव या दोघांनीही इजहान मिर्झा मलिक असे ठेवले आहे. शोएब मलिकने मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सानियाने मुलाला घेतलेला एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण या मुलाचे नाव इजहान आहे हे त्याच्या ब्लँकेटवरून समजले होते. आता मुलाचा चेहरा दाखवणारा एक फोटो सानिया मिर्झाने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर सानियाने फोटो ट्विट करताच त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी सानियाला शुभेच्छा दिल्या आहेत.Living life in the fast lane can be fun !!! It’s time to say hello to the world ???? pic.twitter.com/PVBU987wjc
— Sania Mirza (@MirzaSania) December 22, 2018
आणखी वाचा























