एक्स्प्लोर

TRS President : राष्ट्रपतीपदाची निवडणूक, तिसरी आघाडी होणार का? के चंद्रशेखर राव यांची मोर्चेबांधणी सुरु

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे सध्या देशात तिसरी आघाडी तयार करण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे.

TRS President : सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे. कारण ते सध्या देशात तिसरी आघाडी तयार करण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. याबाबत त्यांनी बैठकाही घेतल्या असून अनेक नेत्यांच्या भेटीही घेणार आहेत. दरम्यान, येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी त्यांना हा मोर्चा उभा करायचा आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला आव्हान द्यायचे आहे. त्यामुळे ते सध्या विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करत आहेत. 

बिहार आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न 

दरम्यान, इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, के चंद्रशेखर राव सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. ते एनडीएचे सहयोगी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही या आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. के सी आर यांनी काल अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेतली. तसेच त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.  

अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही के चंद्रशेखर राव यांनी भेट घेतली आहे. तसेच त्यांनी दिल्लीतील शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला देखील भेट दिली. त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिगर-काँग्रेस आणि बिगर भाजप उमेदवार उभे करण्याचा के सी आर विचार करत आहेत, तो उमेदवार तिसऱ्या आघाडीचा असावा असे प्रयत्न सुरु आहेत.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार आहेत

के सी आर यांनी 26 मे रोजी बंगळुरु इथे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत के सी आर यांनी देवेगौडा यांना बिगर भाजप आघाडीसाठी पाठिंबा दिला होता. अलीकडेच देवेगौडा यांनी के सी आर यांचे भाजप आणि सांप्रदायिक शक्तींविरुद्धच्या लढ्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यामुळे या प्रकरणावर राव यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसला जर आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल ते देऊ शकते. आम्ही सगळ्यांच्या पसंतीचा उमेदवार उभा करु असेही सांगण्यात आले आहे.

के सी आर या महिन्यात अनेक नेत्यांना भेटणार 

26 मे रोजी देवेगौडा यांची भेट घेतल्यानंतर के सी आर 28 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. भाजपच्या विचारसरणीशी संबंधित नसलेल्या सर्व नेत्यांना राव भेटणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या एक वर्ष आधी मार्च 2018 मध्ये त्यांनी कोलकाता येथे फेडरल फ्रंट उघडण्याच्या कल्पनेवर एकमेकांना पाठिंबा दिला होता. जानेवारी 2019 मध्ये, ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे संयुक्त भारत रॅलीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सर्व प्रमुख विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र, 4 महिन्यांनी लगेच लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये मात्र, युती झाली नाही. ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर के सी आर राव हे भाजपच्या पाठिंब्याने बिहारमध्ये सरकार चालवत असलेले नितीश कुमार यांचीही भेट घेणार आहेत. यासोबतच या महिन्याच्या अखेरीस ते आरजेडी अध्यक्ष तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहेत. इतकंच नाही तर तिसरी आघाडी मजबूत करण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही के सी आर यांनी काही दिवसापूर्वी भेट घेतली होती.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Embed widget