एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विवाहितेला व्हॉट्सअॅपवर ब्लॅकमेल, सोलापूरच्या तरुणाला बेड्या
कल्याण : कल्याणमध्ये राहणाऱ्या एका नवविवाहित तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या सोलापूरच्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैसे न दिल्यास 'सेक्स फॉर सेल' अशा टॅगलाईनसह तरुणीचे फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती.
कल्याणमध्ये एका सल्लागार कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला एका अनोळखी क्रमांकावरुन व्हॉट्सअॅपवर तिचाच फोटो आला. एअरटेल मनी अॅपवरुन पैसे न पाठवल्यास 'सेक्स फॉर सेल' अशा टॅगलाईनसह हा फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली होती.
धास्तावलेल्या तरुणीने पतीसह पठाणे पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी मागोवा घेतला असता आरोपी सोलापुरातील असल्याचं समोर आलं. एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या जोडप्याचा हा 17 वर्षीय मुलगा असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी संबंधित नंबरवर फोन केला असता, स्विच्ड ऑफ लागला. फोन स्विच्ड ऑफ असूनही त्याच नंबरचं व्हॉट्सअॅप सुरु होतं. हा प्रकार आपल्यासाठी नवीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीने पुन्हा पैशांची मागणी केली असता पोलिसांनी तरुणीला थोडी रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितलं. तोपर्यंत सोलापुरातील सांगोला तालुक्यातल्या आरोपीचा पत्ता शोधला होता.
ज्या व्यक्तीच्या नावे नंबर नोंदवण्यात आला होता, त्याचा शोध पोलिसांनी घेतला असता आपण असं कुठलंच कृत्य केलं नसल्याचं त्याने सांगितलं. आपलं सीम कार्ड वायफाय वापरण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलाने घेतल्याची माहिती त्याने दिली. अशाप्रकारे पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच फोनवरुन पीडित तरुणीला व्हॉट्सअॅप पाठवल्याचं स्पष्ट झालं. चौकशीदरम्यान अखेर तरुणाने आरोपांची कबुली दिली. विविध विद्यार्थ्यांचं सीमकार्ड घेऊन व्हॉट्सअॅप अॅक्टिव्हेट करुन अशाप्रकारे अनेकांना ब्लॅकमेल केल्याची कबुली त्याने दिली. अनेक पुरुषांनाही अशाप्रकारे ब्लॅकमेल करुन पैसे उकळल्याचंही त्याने सांगितलं. दरम्यान, अधिक चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
Advertisement