National Teacher Award 2021: देशातील 44 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव
National Teacher Award 2021: शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरातील 44 शिक्षकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या देशभरातील 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सर्वांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. देशातील कोरोना स्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने या वर्षीचा कार्यक्रम हा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक आदर्श आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली पण आजही त्यांची ओळख ही एक शिक्षक म्हणूनच आहे. आज मला देशातील शिक्षकांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे." राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या कार्याचाही उल्लेख केला.
LIVE: President Kovind presents National Awards to Teachers in virtual mode #TeachersDay https://t.co/mzrw3KACoO
— President of India (@rashtrapatibhvn) September 5, 2021
आपल्या देशातील शिक्षण हे नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यं रुजवणारं असावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. शिक्षकांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा आणि एक आदर्श भारत घडवण्यात हातभार लावावा असंही आवाहन त्यांनी केलं.
शिक्षकों को ध्यान रखना चाहिए कि प्रत्येक विद्यार्थी की क्षमता अलग होती है, उनकी प्रतिभा अलग होती है, मनोविज्ञान अलग होता है, सामाजिक पृष्ठभूमि व परिवेश भी अलग-अलग होता है। इसलिए हर एक बच्चे की विशेष जरूरतों, रुचियों और क्षमताओं के अनुसार उसके सर्वांगीण विकास पर बल देना चाहिए।
— President of India (@rashtrapatibhvn) September 5, 2021
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड ही सुरुवातीला जिल्हास्तरीय पातळीवरून सुरु होते, त्यानंतर ती राज्यस्तरीय पातळीवर केली जाते. शेवटी सर्व राज्यांतून आलेल्या शिफारसीवरून देश पातळीवर या शिक्षक पुरस्काराच्या मानकरींची निवड केली जाते.
महत्वाच्या बातम्या :
- Krishna Nagar Wins Gold: : पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरची 'सुवर्ण' कामगिरी, भारताचं पाचवं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या 19 वर
- Money Heist : मुंबई पोलिसांनाही भुरळ घालणाऱ्या Bella Ciao या गाण्याचा भन्नाट इतिहास माहिती आहे का?
- Nipah virus : केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह व्हायरसचं संकट गडद, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू