Money Heist : मुंबई पोलिसांनाही भुरळ घालणाऱ्या Bella Ciao या गाण्याचा भन्नाट इतिहास माहिती आहे का?
बेला चाओ (Bella Ciao) हे इटलीतील लोकगीत असून पुढे ते फॅसिस्ट शक्तीच्या विरोधातील (Anti Facist) क्रांतीचं एक प्रतिक बनलं. कोरोना काळातही लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या गीतानं केलं आहे.
मुंबई : मनी हाईस्टच्या (Money Heist) पाचव्या सीझनची भुरळ जगभरात अनेकांना पडली आहे. ही मालिका जरी चोरीच्या घटनेवर आधारित असली तरी मुंबई पोलिसांनाही त्याने चांगलीच भुरळ घालती आहे. मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग रिलीज झालेल्या दिवशी मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये मनी हाईस्टच्या बेला चाओ (Bella Ciao) या सुप्रसिद्ध गाण्यावर मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाने भन्नाट इंन्स्ट्रुमेंट वर्जन सादर केलं. त्याचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होतोय. पण मनी हाईस्टमध्ये वापरण्यात आलेलं बेला चाओ गीताला खूप मोठा इतिहास आहे.
मुंबई पोलिसांवर देखील Money Heist ची जादू, Bella Ciao गाण्यावर केला जबरदस्त परफॉर्मन्स
"प्रोफेसरचं जीवन हे एका कल्पनेभोवती फिरतं, ते म्हणजे प्रतिकार (Resistance). त्याचे आजोबा, ज्यांनी इटलीतील फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात लढा दिला, त्यांनी हे गीत प्रोफेसरला शिकवलं आणि त्याने आम्हाला शिकवलं" असं या मालिकेतील एक पात्र टोकियो सुरुवातीला सांगते. त्यानंतर अनेकदा हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय.
बेला चाओ गाणे हे इटालियन लोकगीत
La Casa de Papel म्हणजेच मनी हाईस्ट मध्ये वापरण्यात आलेलं हे गीत मूळचे इटालियन लोकगीत आहे. त्याचा शब्दशा अर्थ हा "Goodbye Beautiful" असा होतो. उत्तर इटलीत भाताच्या शेतात काम करणाऱ्या महिला कामगार आपलं काम करताना हे गीत गायच्या. काम करताना टाईम पास व्हावा हा त्यामागे उद्देश होता.
फॅसिस्ट शक्तीच्या विरोधातील क्रांतीचं प्रतिक
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे गाणं म्हणजे इटलीतील आणि जगभरातील फॅसिस्ट शक्तीच्या विरोधातील लढ्याचं एक प्रतिक बनलं होतं. इटलीत तर 1943 ते 1945 दरम्यान, या गाण्याने क्रांतीच घडवून आणली. इटलीतून जगभरात जसं या गाण्याचा प्रसार होऊ लागला तसतसं या गाण्याच्या शब्दामध्ये त्या-त्या देशांच्या संदर्भात, फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातील शब्दांची भर पडत गेली.
Money Heist 5 : 'जगप्रसिध्द चोरी' पाहण्यासाठी जयपूरच्या कंपनीने दिली आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी
कोरोना काळात लोकांत आत्मविश्वास निर्माण
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जगभरातील अनेक देशांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्यामध्ये इटलीचे नाव वरती घेता येईल. इटलीमध्ये अनेकांचा जीव गेला, अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळेली नाही, ऑक्सिजन नाही अशी अवस्था होती. त्या वेळी इटलीतील लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी आणि देश पुन्हा नव्याने उभा रहावा यासाठी तिथल्या लोकांनी या बेला चाओ गाण्याचं गायन करायला सुरुवात केली. लोक आपल्या बाल्कनीत यायचे आणि त्यांच्याकडील जे काही वाद्य असेल त्याच्या तालावर बेला चाओ गाणे गायचे. त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला.
अनेक प्रतिकांचा वापर
मनी हाईस्टमध्ये बेला चाओ या गाण्याचा वापर हा अत्यंत शिताफीने केल्याचं दिसून येतंय. हे गाणं फॅसिस्ट शक्तीच्या विरोधातील आहे आणि आपल्या चोरीला एक लोकमान्यता मिळावी, सरकार कसं फॅसिस्ट आहे हे लोकांना दाखवण्यासाठी यामध्ये बेला चाओ गाण्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच मनी हाईस्टमध्ये लाल मास्कचा देखील वापर करण्यात आला आहे. लाल रंग हा जगभरातील क्रांतीचे प्रतिक मानला जातो.
मनी हाईस्टच्या तिसऱ्या सीझनची टॅगलाईनच होती, "join the resistance".
Money Heist 5 Review : नव्या सीझनमध्ये जुनाच वेग आणि अधिक रोमांच; सुरु आहे बँकेची लूट