Teachers Day 2021: 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो? त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
Teachers Day 2021 in India: भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना या दिवशी शिक्षकाच्या मेहनतीचे, दूरदृष्टीचे आणि समर्पणाचे आभार मानण्याची संधी आहे.
Teachers Day 2021 in India: भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतात शिक्षकांनाही पालकांच्या बरोबरीचे स्थान दिले जाते. ज्याप्रकारे कुंभार मातीचे रुपांतर भांड्यात करतो, लोहार लोखंड तापवून काहीतरी उपयुक्त तयार करतो, त्याच प्रकारे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात.
विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान यावरून लक्षात येते की शिक्षकाशिवाय विद्यार्थ्याचे आयुष्य अपूर्ण आहे आणि अशा जीवनाची कल्पनाही करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्याचा इतिहास आणि महत्त्व सांगणार आहोत.
शिक्षक दिनाचा इतिहास
भारतातील शिक्षक दिन माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. किंबहुना, त्यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा आपल्या विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली होती. माजी राष्ट्रपतींचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुमणी येथे झाला. डॉ.राधाकृष्णन जेव्हा भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी आणि मित्र त्यांना भेटायला आले आणि त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. त्यावेळी ते म्हणाले की माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर माझ्यासाठी अभिमान वाटेल. त्या काळापासून आजपर्यंत माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाला शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक दिनाचे महत्त्व
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिनाचे महत्त्व खूप आहे. कारण शिक्षक विद्यार्थ्याला योग्य भविष्य आणि योग्य मार्गावर चालायला शिकवतो. तो विद्यार्थ्याला चांगल्या आणि अयोग्यची समज शिकवतो. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याला या दिवशी शिक्षकाच्या या मेहनतीबद्दल आभार मानण्याची संधी आहे. म्हणून हा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास मानला जातो. मात्र, सध्या शाळा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना घरुनच आपल्या शिक्षकांना शुभेच्छा द्याव्या लागणार आहेत.