तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 33 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
तामिळनाडूतील (Tamil Nadu) करुरमध्ये राजकारणी आणि अभिनेता विजय यांच्या रॅलीदरम्यान (Vijay rally) चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Stampede Like Situation at Vijay rally : तामिळनाडूतील (Tamil Nadu) करुरमध्ये राजकारणी आणि अभिनेता विजय यांच्या रॅलीदरम्यान (Vijay rally) चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करुर सरकारी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमीही झाले आहेत. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
विजय यांनी भाषण थांबवले
गर्दीतील अनेक लोक बेशुद्ध पडल्याने विजय यांना त्यांचे भाषण तात्पुरते थांबवावे लागले. गर्दीमुळं अनेक पक्ष कार्यकर्ते आणि मुले कोसळून बेशुद्ध पडली. यावेळी विजय यांनी व्यासपीठावरून गर्दीला शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले.
मंत्री आणि जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहोचले
परिस्थिती लक्षात येताच, द्रमुक मंत्री सेंथिल बालाजी आणि करुर जिल्हा जिल्हाधिकारी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. जखमी असलेल्यांवर उपचार देखील सुरु आहेत. गर्दीत अडकल्यामुळं अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. यानंतर ते भाषण सोडून निघून गेले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेबद्दल दुख: व्यक्त केले
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu Chief Minister MK Stalin) यांनी घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. मंत्री अनबिल महेश यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. त्यांनी पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने परिस्थिती पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अण्णा द्रमुकचे सरचिटणीस एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनी करूर येथील विजय यांच्या पक्षाच्या टीव्हीके रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. विजय यांच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 29 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण बेशुद्ध होऊन रुग्णालयात दाखल आहेत. हे ऐकून मला धक्का बसला आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो असे स्टॅलिन म्हणाले.
लाठीचार्जनंतर चेंगराचेंगरी झाली
अभिनेता विजयच्या रॅलीत जमलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
महत्वाच्या बातम्या:























