एक्स्प्लोर
तामिळनाडूत हिंसक आंदोलन, पोलिसांच्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, यामध्येच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, ज्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, यामध्येच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.
वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण लागलं आणि यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला.
हिंसाचारानंतर राजकारण तापलं
पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राजकारण तापलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू होणं हे राज्य पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे, असं ट्वीट त्यांनी केलं. तर तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली.
तामिळनाडूत जमावबंदी लागू
आंदोलन अचानक हिंसक झालं आणि गाड्यांची तोडफोड करत जाळपोळही करण्यात आली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, ज्यानंतर वातावरण अधिकच बिघडलं. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अकरा जणांचा मृत्यू झाला. वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. मद्रास हायकोर्टाने सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत, तर हिंसाचारानंतर पोलिसांनी राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू केलं आहे.
तूतीकोरीन शहरात तांडव कशामुळे?
तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपरचा युनिट आहे. या युनिटमुळे हवा आणि पाण्याचं गंभीर प्रदूषण होत आहे. काही वृत्तांनुसार, तूतीकोरीन शहरात प्रत्येक घरामध्ये दोन जण आजारी आहेत. लोकांना श्वास, त्वचा आणि हृदयाचे आजार झाले आहेत. जानेवारीमध्ये या प्लांटचा विस्तार करण्याचं वृत्त आल्यानंतर विरोधी तीव्र झाला.
हिंसाचारातील मृतांना प्रत्येकी 10 लाख रुपये
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तर जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जाणार आहेत.
दरम्यान, या प्लांटमधून निघालेल्या प्रदूषणामुळे जे पीडित आहेत, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना नोकरी देण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement