एक्स्प्लोर
‘बिग बॉस’फेम स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण
नवी दिल्ली : ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण झाली. नथुराम गोडसेच्या जंयतीनिमित्त कार्यक्रमात ही घटना घडली.
दिल्लीतील विकासनगरमध्ये नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी बिग बॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबा यांना निमंत्रण होतं.
या कार्यक्रमाला स्वामी ओम बाबा यांना बोलवण्यात आल्यानं जमलेले नागरिक भडकले. वादग्रस्त व्यक्तीला गोडसेच्या जयंतीला का बोलावलं, असा सवाल करत उपस्थितांनी स्वामी ओम बाबांना जबर मारहाण केली.
या मारहाणीनंतर स्वामी आपल्या गाडीतून जात असताना जमलेल्या लोकांनी गाडीला घेराव घातला. संतापलेल्या नागरिकांनी स्वामी ओम बाबांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचा चालक जखमी झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement