Indian Railway Data Breach: रेल्वे प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरीला? रेल्वेच्या डेटा हॅकिंगबाबत IRCTC ने 'हे' उत्तर दिले
IRCTC Data Breach: भारतीय रेल्वेच्या डेटा ब्रीचबाबत आयआरसीटीसीने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सर्व व्यावसायिक भागीदारांना अलर्ट देखील देण्यात आला आहे.
IRCTC Data Breach: भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) डेटा हॅक (IRCTC Data Breach) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. IRCTC ने भारतीय रेल्वेच्या डेटा चोरीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा देणारी आयआरसीटीसी कंपनी म्हणाली की, आमचा कोणताही डेटा चोरीला गेला नाही.
"आयआरसीटीसी सर्व्हरवरून कोणताही डेटा चोरी झाला नाही"
डेटा चोरीच्या संदर्भात, IRCTC ने सांगितले की, CERT-In च्या माध्यमातून भारतीय रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांचा डेटा चोरीला गेल्याचा अलर्ट रेल्वेला देण्यात आला होता. यानंतर, तपासात आढळले की, आयआरसीटीसी सर्व्हरवरून कोणताही डेटा चोरी झाला नाही. IRCTC ने सांगितले की, या प्रकरणी सर्व्हरची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक भागीदारांना देखील सूचित केले आहे.
तो डेटा IRCTC सर्व्हरशी संबंधित नाही? काय म्हणाले भारतीय रेल्वे?
भारतीय रेल्वेने सांगितले की, मीडियामध्ये रेल्वेतील डेटा चोरीच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर लगेचच रेल्वे बोर्डाने अलर्ट जारी करण्यात आले होते. या प्रकरणी तपास केल्यानंतर, असे आढळून आले की IRCTC ची हिस्ट्री API शी जुळत नाही, म्हणजेच ते IRCTC सर्व्हरशी संबंधित नाही. त्यानंतर आयआरसीटीसीकडून अधिक तपास करण्यात आला. IRCTC च्या सर्व व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या डेटाची चोरी झाली आहे की नाही? हे शोधण्यासाठी त्वरित चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण काय?
या संदर्भात अशी माहिती मिळाली होती की, ज्या प्रवाशांचा डेटा चोरीला गेला. त्यांच्या डेटामध्ये लोकांच्या वैयक्तिक तपशीलांशी संबंधित माहिती आहे, म्हणजे त्यांचा ईमेल आयडी, लिंग, वय आणि फोन नंबर इत्यादी. दरम्यान, आयआरसीटीसीने याबाबतचे निवेदन दिले आहे. मात्र भारतीय रेल्वेने सांगितले की, असे एकही प्रकरण नाही जिथे डेटा चोरीची बातमी आली आहे. अलीकडेच एम्सचा सर्व्हर हॅक झाला होता. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले.
रेल्वेच्या वेबसाइटवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष
एम्सनंतर आता सायबर गुन्हेगारांनी रेल्वेच्या वेबसाइटवर डल्ला मारल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारतीय रेल्वेच्या सुमारे 3 कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होता. मात्र भारतीय रेल्वेने या वृत्ताला नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबरला या युजर्सचा डेटा हॅकर फोरमवर विकला जात असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर डेटा विक्रेत्याने फोरमवर शॅडोहॅकरच्या नावाने माहिती टाकली होती.
इतर बातम्या