एक्स्प्लोर
मंगळावर अडकलात तरी सोडवू, स्वराज यांचं धमाल उत्तर
मुंबई : परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताचं परराष्ट्र मंत्रालय तातडीने मदत पोहचवत असल्याचं वारंवार पहायला मिळालं आहे. ट्विटरच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तत्परतेने नागरिकांना उत्तर देतात. यावरुनच विनोद करणाऱ्या एका नेटिझनलाही स्वराज यांनी धमाल उत्तर दिलं आहे.
परदेशात अडकलेल्या भारतीयांनी ट्विटरवरुन मदत मागितल्यास, त्यांना तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या
सुषमा स्वराज यांचं ट्विटरवर अनेकदा कौतुक होत असतं. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एखादी भारतीय व्यक्ती अडकलेली असो, स्वराज जातीने लक्ष घालून त्याला मायदेशी आणतात. यावरुन करण सैनी नावाच्या ट्विटराईटने एक विनोदी ट्वीट केलं.
'मी मंगळावर अडकलो आहे, मंगलयानावरुन 987 दिवसांपूर्वी पाठवलेलं जेवण संपत आलं. मंगलयान 2 कधी पाठवलं जाणार?' असा प्रश्न करत करणने सुषमा स्वराज आणि इस्रोला टॅग केलं. मात्र आपल्या प्रश्नाला यापैकी कोणी उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्याला नसावी.
https://twitter.com/ksainiamd/status/872614454923546625
'तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल, तरी भारतीय दुतावास तुमच्या मदतीला धावून येईल' असं उत्तर स्वराज यांनी दिलं. स्वराज यांच्या उत्तराचंही अनेक ट्विटराईट्सनी कौतुक केलं.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/872653636849082368
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement