एक्स्प्लोर

मोदी सरकारकडून लोकशाहीचा आवाज बंद करण्याचं पाप, निलंबनानंतर सुप्रिया सुळे कडाडल्या

सरकारकडून संसदेत लोकशाहीचा आवाज बंद करण्याचं पाप केलं जात असल्याचा हल्लाबोल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी केला.

Supriya Sule : सरकारकडून संसदेत लोकशाहीचा आवाज बंद करण्याचं पाप केलं जात असल्याचा हल्लाबोल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी केला. सरकारला चर्चा करायची नाही, त्यांच्याकडून दडपशाही सुरु असल्याचे सुळे म्हणाल्या. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निलंबित करण्यात आलं आहे. 

संसदेत झालेल्या घुसकोरी प्रकरणी चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, यावर सरकारला चर्चा करायची नाही, त्यांच्याकडून दडपशाही सुरु असल्याचे सुळे म्हणाल्या. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत बोललं पाहिजे असेही सुळे म्हणाले. आम्ही प्रश्न विचारु शकत नाही का? असा सवालही सुळे यांनी केला. भाजप खासदराच्या पासेसवर ती मुलं संसदेत आली होती, आता त्यावर चर्चा नको का करायला असेही सुळे यावेळी म्हणाल्या. विषय फक्त खासदाराच्या सुरक्षेचा नाही तर येथील पोलिसांसह सर्व कर्मचाऱ्यांचा असल्याचे सुळे म्हणाल्या.

विरोध नको म्हणून आमचं निलंबन

आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र, सरकरला मार्ग काढायचा नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते.विरोध नको म्हणून आम्हाला निलंबीत केल्याचे सुळे म्हणाल्या. आमची एवढीच विनंती आहे की, संसदेतील घुसखोरी प्रकरणी या विषयावर चर्चा करावी. गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यावं, पण त्यांना चर्चा करायची नसल्याचे सुळे म्हमाल्या. 100 हून अधिक खासदारांचं सरकारकडून निलंबन केलं आहे. हा लोकशाहीचा आवाज बंद करण्याचे पाप असल्याचे सुळे म्हणाल्या. आमचं सरकार होतं त्यावेळी आम्ही अशी दडपशाही केली नसल्याचे सुळे म्हणाल्या. संसदेत घुसलेल्या लोकांना कोणी पास दिला? त्या भाजप खासदाराचं नाव काय? याबाबतची माहिती देशाला नको का समजायला? असे सुळे म्हणाल्या. संसदेच्या सुरक्षेबाबत एवढी चूक होते, याबाबत विचारायला नको का? असे सुळे म्हणाल्या. 

लोकसभेत नेमकं काय घडलं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.

आज 41 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या:

Parliament Winter Session: मोठी बातमी : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित, आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती

व्हिडीओ

Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget