एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

इस्रो हेरगिरी प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, चार आठवड्यांची दिली वेळ

ISRO Espionage Case: यापूर्वी केरळ उच्च न्यायालयानं चार आरोपींच्या जामिनावर निर्णय दिला होता, तो आता सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे.

ISRO Espionage Case: इस्रो (Indian Space Research Organisation) हेरगिरी प्रकरणातील (Espionage Case) चार आरोपींना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) धक्का दिला आहे. 1994 च्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांच्यावर आरोप केल्याच्या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयानं आरोपींना जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयानं माजी डीजीपींसह चार जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करणारा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश शुक्रवारी रद्द केला. 

इस्रो हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court News) केरळ उच्च न्यायालयाचा (Kerala High Court) निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीवेळी शास्त्रज्ञ (Scientist) नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाचा हाच निर्णय रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाला या याचिकांवर पुढील चार आठवड्यांत पुन्हा निर्णय देण्यास सांगितलं आहे. तसेच, या प्रकरणातील चारही आरोपींच्या अटकेच्या कारवाईलाही तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजेच, जोपर्यंत केरळ उच्च न्यायालय या प्रकरणावरील अंतिम निकाल देत नाही, तोपर्यंत आरोपींना अटकेपासून संरक्षण मिळणार आहे.

इसरोच्या शास्त्रज्ञांविरुद्ध रचला गेला कट 

लाईव्ह लॉनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एमआर शाह (Justice MR Shah) आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार (Justice C. T. Ravikumar) यांच्या खंडपीठासमोर पार पडली. इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आणि त्यांना खोट्या खटल्यात अडकवल्याचा आरोप असलेल्या त्या सर्व अधिकाऱ्यांना जामीन देण्यास या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणी केरळचे माजी डीजीपी सिबी मॅथ्यूज, गुजरातचे माजी एडीजीपी आरबी श्रीकुमार, माजी आयबी अधिकारी पीएस जयप्रकाश आणि दोन केरळ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठानं उच्च न्यायालयाकडून निर्णय देताना काही चुका झाल्या होत्या, असं स्पष्ट केलं. तसेच, त्या चुका सुधारण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी देण्यात येत असल्याचंही सांगितलं. याप्रकरणी वैयक्तिक आरोपांची चौकशी झालेली नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणाची पुन्हा सुनावणी घेऊन योग्य तो निकाल द्यावा असंही सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इस्रो हेरगिरी प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच मुख्य भूमिकेत आर. माधवन दिसून आला होता. Rocketry! या चित्रपटाला भारतीय ज्येष्ठ वैज्ञानिक नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांच्या जीवनावर आधारित माहितीपट म्हणता येईल. ध्येयाने झपाटलेल्या नंबी नारायणन या भारतीय वैज्ञानिकाचा प्रवास उलगडून दाखवतो. तसेच, चित्रपट ISRO च्या संघर्षकथाही आपल्यासमोर उलगडतो.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shivsena On Supreme Court Collegium: सगळ्या यंत्रणांनंतर आता सरकारकडून न्यायव्यवस्था गिळण्याचा प्रयत्न; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Embed widget