Amazon-Future Group Deal : मुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, रिलायन्स-फ्यूचर कराराला स्थगितीचा आदेश
Amazon-Future Group Deal : रिलायन्स-फ्यूचर (Reliance-Future Deal) ग्रुपमध्ये झालेल्या कराराला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अॅमेझॉनने या कराराविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नवी दिल्ली : फ्यूचर ग्रुपसोबत (Future Group) करण्यात आलेल्या करारावरुन सर्वोच्च न्यायालयाने मुकेश अंबांनींच्या रिलायन्स कंपनीला मोठा झटका दिला आहे. रिलायन्स-फ्यूचर ग्रुपमधील कराराला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा करार अवैध असून त्यामुळे आधी करण्यात आलेल्या अॅमेझॉन-फ्यूचर ग्रुपच्या कराराचे उल्लंघन होत असलाचं सांगत या कराराविरोधात अॅमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या 24,713 कोटी रुपयांच्या कराराला स्थगिती मिळाली आहे. महत्वाचं म्हणजे सिंगापूरच्या न्यायालयानेही रिलायन्स-फ्यूचर करार अवैध असल्याचा निकाल दिला होता आणि हा करार रद्द करावा असा आदेश दिला होता. आता भारतानेही तोच निकाल दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल कायम
या आधी रिलायन्स-फ्यूचर डील वर अॅमेझॉनने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयानेही हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.
अॅमेझॉनने किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपच्या फ्यूचर कुपन्स लिमिटेड या कंपनीमधील 49 टक्के भागीदारी खरेदी केली होती. याशिवाय फ्यूचर रिटेलमधील 7.3 टक्के वाटा देखील खरेदी केला होता. परंतु हा व्यवसाय किशोर बियानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला 24,713 कोटी रुपयात विकला. फ्यूचर ग्रुपने रिलायन्ससोबत करार करुन, आपल्यासोबत त्या आधी केलेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे, असं सांगत या कराराविरोधात अॅमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार अॅमेझॉनने फ्यूजर ग्रुपसोबत झालेल्या राईट ऑफ फर्स्ट रिफ्युझल आणि नॉन कम्पिट क्लॉझ अंतर्गत फ्यूचर कुपन्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली होती. अॅमेझॉनने कराराचा दाखला देत म्हटलं की, फ्यूचर ग्रुपच्या रिस्ट्रिक्टेड लिस्टमधील कंपन्या कोणत्याही करारात सहभाग घेऊ शकत नाहीत.
रिलायन्ससोबत 24713 कोटींचा करार
कर्जाचं वाढता डोंगर आणि दिवाळखोरीच्या प्रक्रियेपासून वाचण्यासाठी किशोर बियानी यांनी गेल्या वर्षी आपला रिटेल बिझनेस मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला विकला होता. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडरी कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) फ्यूचर ग्रुपसोबतच्या कराराची माहिती दिली होती. यानुसार कंपनी फ्यूचर ग्रुपच्या रिटेल अँड होलसेल बिझनेस आणि लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग बिझनेस संपादित करणार आहे. याद्वारे रिलायन्स फ्यूचर ग्रुपच्या बिग बाजार, EasyDay आणि FBB च्या 1,800 पेक्षा अधिक दुकानांपर्यंत पोहोचेल, जी देशातील 420 शहरांमध्ये आहेत. हा सौदा 24713 कोटी रुपयांमध्ये झाला होता. या करारानंतर रिलायन्स रिटेल बिझनेसमध्ये अॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या फ्लिपकार्टला टक्कर देण्याच्या स्थितीत पोहोचली होती.
महत्वाच्या बातम्या :
- पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
- International Beer Day : वड पाच्ची...! बिअर पिताय तर हे वाचाच, बिअरचे जितके फायदे तितकेच तोटेही!
- Rabindranath Tagore : रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या दहा महत्वाच्या गोष्टी