नोटबंदीचा निर्णय योग्य की बेकायदा? आज निकालाची शक्यता, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Supreme Court On Demonetisation: मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय बेकायदा असल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. 2016मधील नोटबंदीच्या निर्णयावर आज निकालाची शक्यता आहे.
![नोटबंदीचा निर्णय योग्य की बेकायदा? आज निकालाची शक्यता, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी Supreme Court On Demonetisation note ban in 2016 supreme court can give verdict on demonetisation pleas today 2nd january Marathi News नोटबंदीचा निर्णय योग्य की बेकायदा? आज निकालाची शक्यता, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/f92533920c6eb534247e6d8b68fd9f6b1672573655364432_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Supreme Court On Demonetisation: केंद्र सरकारने (Central Government) 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या (Demonetisation) निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आज निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं सहा वर्षांपूर्वी हा निर्णय घेताना एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. हिवाळ्याच्या सुटीनंतर न्यायालयाचे कामकाज आजपासून पुन्हा सुरू होत असून पहिल्याच दिवशी नोटबंदीबाबत निर्णय जाहीर होणार आहे.
न्यायमूर्ती एस. ए. नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचे घटनापीठ याबाबत निकाल जाहीर करणार आहे. नोटबंदीचा निर्णय बेकायदा होता, असा आरोप करत अनेक जणांनी याविरोधात याचिका दाखल केल्या होत्या.
8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटाबंदीच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचं खंडपीठ आज म्हणजेच, सोमवारी (2 जानेवारी) निकाल देण्याची शक्यता आहे. नोटाबंदीसाठी आवश्यक ती प्रक्रिया पाळली गेली नाही आणि मनमानी पद्धतीनं निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांमध्ये करण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी 7 डिसेंबर रोजी केंद्र आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यांना 2016 मध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाशी संबंधित रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, अशा निर्णयांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी न्यायालयाला नियम तयार करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.
नोटबंदीच्या निर्णयामुळे देशभरात खळबळ
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी अचानक टीव्हीवर लाईव्ह येऊन नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या घोषणेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून एटीएम (ATM) आणि बँकांसमोर लोक सकाळपासून रात्रीपर्यंत रांगेत उभे राहून आपल्याकडच्या जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेत होते. जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्याचं सत्र बरेच दिवस चाललं. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
यापूर्वी, खंडपीठानं केंद्राच्या 2016 च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी, आरबीआयचे वकील आणि ज्येष्ठ न्यायाधीश पी चिदंबरम, श्याम दिवान यांच्यासह याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला होता. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या सुनावणीदरम्यान निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, आज होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.
नोटबंदी प्रकरणी दोन निकाल जाहीर होण्याची शक्यता
नोटबंदीच्या निर्णयावर दोन भिन्न मतप्रवाह असण्याची शक्यता आहे. यापैकी एका प्रकरणावर न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बी. व्ही. नागारत्न करणार आहेत. न्यायमूर्ती नजीर, न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती नागारत्न यांच्याशिवाय, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या सदस्यांमध्ये न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)