एक्स्प्लोर
सीबीआय वाद - आलोक वर्मांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
यासंबंधी मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. वर्मा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले होते. याच विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती.
नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. यासंबंधी मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. वर्मा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले होते. याच विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या रिपोर्टवर सर्वोच्च न्यायालयाने अलोक वर्मा यांना बंद पाकिटात उत्तर मागितले होते. या बंद पाकिटात सादर केलेल्या वर्मा यांच्या उत्तरावर सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि त्यांचे खंडपीठ विचार करतील अशी शक्यता आहे.
आलोक वर्मा यांच्या उत्तरावर 20 नोव्हेंबर रोजीच सुनावणी होणार होती. मात्र बंद पाकिटातील केंद्रीय दक्षता आयोग (सीवीसी) रिपोर्ट आणि वर्मा यांच त्यावरील उत्तर आणि तपास अधिकारी मनिष कुमारद्वारे लावण्यात आलेल्या आरोपाचे अर्ज प्रसारमाध्यमांना मिळाले होते. त्यामुळे सरन्यायधीश रंजन गोगाई आणि त्यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत 29 नोव्हेंबर पर्यंत सुनावणी स्थगित केली होती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय मंत्री हरिभाई पी चौधरी, केंद्रीय दक्षता आयोगाचे के. व्ही चौधरी, सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना हे सर्व या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचे आरोप तपास अधिकारी मनिष कुमार यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement