एक्स्प्लोर
'नीट'चा निकाल 26 जूनपर्यंत जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं सोमवारी मद्रास हायकोर्टाकडून 'नीट' परीक्षेचे निकाल जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली असून, 26 जूनपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच यापुढे नीट संदर्भात कोणत्याही याचिका स्वीकारू नये, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयानं देशभरातल्या उच्च न्यायालयानं दिले आहेत.
मद्रास हायकोर्टाच्या मदुरौ खंडपीठाने 24 मे रोजी नीट परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती. हा निकाल देताना, 'नीट' परीक्षेच्या हिंदी आणि इंग्रजी पेपरमध्ये तफावत होती का? असा सवालही मद्रास उच्च न्यायालयानं उपस्थीत केला होता.
त्याविरोधात सीबीएसई बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. यावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पीसी पंत आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु असताना न्यायालयानं ही स्थगिती उठवली. तसेच या पुढे 'नीट' संदर्भात कोणत्याही याचिका स्वीकारू नये, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयानं देशभरातल्या उच्च न्यायालयानं दिले.
दरम्यान, सध्या देशभरातील साडे 11 लाख विद्यार्थ्यांनी 'नीट'ची परीक्षा दिली असून, यातील जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत परीक्षा दिली. तर उर्वरीत दीड लाख विद्यार्थ्यांनी इतर भाषांमध्ये परीक्षा दिली होती.
पण मद्रास हायकोर्टाच्या स्थगितीमुळे साडे 11 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने सीबीएसईच्या याचिकेवरील सुनावणीवेळी मद्रास हायकोर्टाची बंदी उठवली असून, 26 जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश सीबीएसईला दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement