एक्स्प्लोर

Pink Super Moon | आज दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद्र

जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी होते आणि चंद्राची चमक वाढते तेव्हा अशा वेळी सुपरमूनचे दर्शन घडते.

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत आहे. या परिस्थितीत जग एका अद्भूत खगोलीय घटनेचा साक्षीदार बनणार आहे. बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री या वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. एवढचं नाही तर चंद्राचा रंग देखील बदलणार आहे. कारण चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. म्हणजे रात्रीचा चंद्र गुलाबी पाहायला मिळणार आहे. काय आहे सूपरमून ? जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी होते आणि चंद्राची चमक वाढते तेव्हा अशा वेळी सुपरमूनचे दर्शन घडते. या काळात, चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्क्यांनी मोठा आणि 30 टक्क्यांनी अधिक चमकतो. पिंक सुपरमून म्हणजे काय ? पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. हे फुल गुलाबी रंगाचे असते. त्यामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात. सुपरमून भारतात कधी दिसणार? आशियासह इतरांसाठीही सुपरमून 8 एप्रिल रोजी युनिव्हर्सल टाईमप्रमाणे मध्यरात्री 2.35 वाजता दिसेणार आहे. मात्र त्यावेळी भारतामध्ये सकाळी 8 वाजलेले असणार आहे. उजेड असल्याने हा चंद्र आपल्या येथे दिसणार नाही. 41 वर्षापूर्वी दिसला होता सूपरमून ? अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, साधारण 41 वर्षांपूर्वी 1979 मध्ये पहिला सुपरमून दिसला होता. यंदा मे महिन्यातही सुपरमून दिसणार आहे. कसा पाहता येणार सूपरमून? सुपर मून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष लेन्स किंवा इतर उपकरणांची आवश्यकता नाही. आपण आपल्या घराच्या बाल्कनी आणि टेरेसवरून देखील पाहू शकतो. संबंधित बातम्या :
 
महत्त्वाच्या बातम्या

नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नेपाळमधील महाप्रलयात देशातील दिग्गज टेक कंपनीचे सीईओ सुद्धा बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, कंपनीकडून निवेदन प्रसिद्ध
नेपाळमधील महाप्रलयात देशातील दिग्गज टेक कंपनीचे सीईओ सुद्धा बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, कंपनीकडून निवेदन प्रसिद्ध
Crime News: पती, पत्नी, प्रेयसी, एक्स बॉयफ्रेंड... प्रियकराच्या पत्नीला संपवलं, घराशेजारीच मृतदेह फेकला अन्...; घटनेचा तपास करताना पोलीसही चक्रावले
पती, पत्नी, प्रेयसी, एक्स बॉयफ्रेंड... प्रियकराच्या पत्नीला संपवलं, घराशेजारीच मृतदेह फेकला अन्...; घटनेचा तपास करताना पोलीसही चक्रावले
Rahul Gandhi: 'तर त्याहून मोठी आमची प्रतिक्रिया असेल, चेंडू आता त्यांच्या कोर्टात..' मल्लिकार्जुन खरगेंच्या भाषणानंतर झालेल्या शुद्धीकरणावर राहुल गांधींचा सूचक इशारा
'तर त्याहून मोठी आमची प्रतिक्रिया असेल, चेंडू आता त्यांच्या कोर्टात..' मल्लिकार्जुन खरगेंच्या भाषणानंतर झालेल्या शुद्धीकरणावर राहुल गांधींचा सूचक इशारा

व्हिडीओ

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत | ABP Majha Special Report
Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
Embed widget