एक्स्प्लोर
सनी देओल चित्रपटातला तर मी खरोखरचा फौजी : मुख्यमंत्री अमरिंदर सिंह
बॉलिवूड अभिनेता सनी देओलने नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सनीला भाजपने पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
अमृतसर : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सनीला भाजपने पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सनी देओल चित्रपटातला फौजी आहे आणि मी खरोखरचा फौजी. सनीने निवडणूक लढल्यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही.
सुनील जाखड हे गुरुदासपूरमधील काँग्रेसचे खासदार झाले आहेत. 2017 साली गुरुदासपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जाखड विजयी झाले होते. यावर्षी भारतीय जनता पक्षाने अभिनेता सनी देओलला या मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. परंतु सनी देओलच्या निवडणूक लढण्यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, उलट आम्ही त्याला हरवू असे मत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केले आहे.
गुरुदासपूर लोकसभा मतदार संघात दोन दशके भाजपचे वर्चस्व होते. दिवंगत बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना या मतदार संघातून 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये खासदार झाले होते. 27 एप्रिल 2017 मध्ये खन्ना यांच्या निधनानंतर या मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत सुनील जाखड बहुमताने विजयी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement