(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IIT मद्रासमध्ये 5G ची यशस्वी चाचणी, अश्विनी वैष्णव यांनी केला व्हिडीओ कॉल
5G Call: IIT मद्रास मध्ये 5G कॉल चे यशस्वी परीक्षण करण्यात आलं आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल केला.
चेन्नई: आयआयटी मद्राममध्ये 5G सेवेचे यशस्वी परीक्षण करण्यात आलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पहिला 5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल केला. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण एन्ड टू एन्ड नेटवर्क भारतात तयार करण्यात आलं आहे. या 5G कॉलचा टेस्टिंग व्हिडीओ केंद्रीय मंत्र्यानी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
#WATCH Union Minister for Electronics & Information Technology Ashwini Vaishnaw today tested 5G call at IIT-Madras.
— ANI (@ANI) May 19, 2022
"Entire end to end network is designed and developed in India," he added pic.twitter.com/HNtWFgQHVz
त्या आधी अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितलं होतं की, सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत भारतामध्ये स्वदेशी 5G चा आराखडा तयार करण्यात येईल. हा स्वदेशी आराखडा भविष्यातील अफाट यशाचे प्रतिक असेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- ट्राय कडून आयोजित एका कार्यक्रमात अश्विनी वैष्णव यांनी हा विश्वास व्यक्त केला.
5G सेवा सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे. स्वदेशी 5G तंत्रज्ञान स्वदेशी 5G खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. देशातील पहिला 5G कॉल ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी जून ते जुलै दरम्यान स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दरम्यान, स्पेक्ट्रमचा लिलाव 20 वर्षांसाठी असेल किंवा 30 वर्षांसाठी असेल याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या: