Subhash Chandra Bose : 23 जानेवारीला 'पराक्रम दिन' का साजरा केला जातो? वाचा या दिनाचा इतिहास
Subhash Chandra Bose : सुभाषचंद्र बोस यांनी देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Subhash Chandra Bose : आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले. भारताचे आघाडीचे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) हेदेखील यांपैकीच एक आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा संबंध पराक्रम दिनाशी संबंधित आहे. 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे याच निमित्ताने दरवर्षी 23 जानेवारीला पराक्रम दिन हा साजरा केला जातो. क्रांतिकारकांच्या धैर्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे.
या दिनानिमित्त भारतात अनेक कार्यक्रम पार पडले जातात. पराक्रम दिनानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते आणि स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी ताज्या केल्या जातात.
सुभाषचंद्र बोस यांनी देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे संपूर्ण जीवन धैर्य आणि शौर्याची गाथा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'तुम मुझे खून दो, में तुम्ही आझादी दूंगा' असा नारा दिला होता. या घोषणेने स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या भारतीयांच्या हृदयात पेटलेली आग आणखी तीव्र केली. पराक्रम दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील नेमका संबंध काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
पराक्रम दिनाचा इतिहास
दरवर्षी 23 जानेवारीला पराक्रम दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली केली होती. भारत सरकारच्या घोषणेनंतर, दरवर्षी 23 जानेवारी रोजी पराक्रम दिन साजरा केला जाऊ लागला.
पराक्रम दिन फक्त 23 जानेवारीलाच का साजरा केला जातो?
भारत सरकारने हा दिवस सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने समर्पित केला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारीला झाला. दरवर्षी नेताजींच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन साजरा करून त्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहिली जाते.
सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून का साजरी केली जाते?
सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी करण्याचेही एक कारण आहे. बोस यांचे संपूर्ण जीवन प्रत्येक तरुण आणि भारतीयांसाठी आदर्श आहे. बोस भारतीय प्रशासकीय सेवेचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रशासकीय सेवा सोडून ते मायदेशी परतले. येथे स्वतंत्र भारताची मागणी करत त्यांनी आझाद हिंद सरकार आणि आझाद हिंद फौज स्थापन केली. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःची आझाद हिंद बँक स्थापन केली, ज्याला 10 देशांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा परदेशात नेला. यांसारख्या अनेक कारणांमुळे 23 जानेवारीला पराक्रम दिन साजरा केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :