एक्स्प्लोर
महाराष्ट्र सदनाच्या अजागळ कारभाराचा मंत्री सुधीर मुनगंटीवारांना फटका
नवी दिल्ली: नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातल्या अजागळ कारभाराचा फटका खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला आहे. महाराष्ट्र सदनातील अमराठी स्टाफनं मुनगंटीवार यांना ओळखलं नसल्याचा फटका राज्याचा अर्थमंत्र्याना बसला.
एकीकडे फ्लाईट पकडण्याची घाई आणि दुसरीकडे असा सावळागोंधळ यामुळे मुनगंटीवार चांगलेच भडकले. यावेळी संतापलेल्या अर्थमंत्र्यांनी लेखी तक्रारसुद्धा दाखल केली.
कोअर ग्रुपसोबतची बैठक संपल्यानंतर मुनगंटीवार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आले. त्यावेळी रिसेप्शनला कुणी जबाबदार अधिकारी नव्हता. त्यावेळी असलेल्या अमराठी स्टाफनं मुनगंटीवारांनना ओळखलं नाही. त्यामुळे त्यांना नेमकी कोणती खोली देण्यात आली आहे यावरुन घोळ सुरु झाला. या सर्व गोंधळामुळे मुनगंटीवार यांना बराच मनस्ताप झाला.
'हे सदन नुसतेच शानदार आहे, इथे सोयीसुविधांचा लवलेशही नाही' असं सुधीर मुनगंटीवार यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement