एक्स्प्लोर

परीक्षेत नापास झालाय, आयुष्यात नाही; नापास विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी केक कापून केलं सेलिब्रेशन

बोर्डाच्या परीक्षेला भविष्याचा पाया म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे, बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा बोर्डाच्या परीक्षेत आपला मुलगा वा मुलगी नापास झाल्यास पालकांकडून रागावण्यात येते.

मुंबई : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC resulst) जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून पेढे वाटून, केक कापून हा आनंद साजरा केला जात आहे. दुसरीकडे नापास विद्यार्थ्यांना धीर देण्याचं कामही सोशल मीडियातून होत आहे. परीक्षा (Exam) ही 12 वीची होती, आयुष्याची नाही, त्यामुळे अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. त्यासह, परीक्षेत जरी कमी गुण मिळाले असले तरी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील करिअर निवडले पाहिजे, असेही मार्गदर्शन केले जात आहेत. त्यातच, कर्नाटकच्या (Karnatak) बागलकोटमधील एका पालकांनी आपल्या नापास मुलाच्या निकालाचा आनंद व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बोर्डाच्या परीक्षेला भविष्याचा पाया म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे, बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा बोर्डाच्या परीक्षेत आपला मुलगा वा मुलगी नापास झाल्यास पालकांकडून रागावण्यात येते. पालकांकडून बोलणे खावे लागतात. मात्र, कर्नाटकच्या बागलकोट येथील एका पालक दाम्पत्याने चक्क आपल्या नापास मुलाचे सेलिब्रेशन केलं आहे. विेशेष म्हणजे या विद्यार्थ्याला 10 वीच्या बोर्ड परीक्षेत केवळ 32 टक्के गुण मिळाले आहेत.

बागलकोट जिल्ह्यात राहणाऱ्या अभिषेक चोलाचगुड्डा हा येथील बसवेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी. विशेष म्हणजे यंदा तो  10 वीच्या बोर्ड परीक्षेत शिक्षण घेत होता. त्यामध्ये, अभिषेकला 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले आहेत. म्हणजे (जवळपास 32%) गुण प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे तो सहाच्या सहा विषयात नापास झाला आहे. त्यामुळे, त्याचे मित्र आणि काही शेजारी, नातेवाईक यांच्याकडून त्याची खिल्ली उडवण्यात येऊ लागली. मात्र, आपल्या मुलाची खिल्ली उडवणाऱ्यांना अभिषेकच्या पालकांनी चांगलीच चपराक लावली आहे. कारण, आपल्या नापास मुलाच्या गुणवत्तेवर नाराज न होता, केक कापून आई-वडिलांनी त्याचे सेलिब्रेशन केले. तू परीक्षेत नापास झाला असशील, पण आयुष्यातील परीक्षेत होणार नाही, असे म्हणत अभिषेकला त्याच्या आई-वडिलांनी जादू की झप्पी दिली. सध्या अभिषेक आणि त्याच्या आई-वडिलांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

समाजापुढे आदर्श ठेवला

एकीकडे मुलांकडून मोठ्या अपेक्षा ठेऊन एक-दोन मार्क कमी पडल्यावर पालक रागवतात. आपल्या शेजारील शर्मा अंकलच्या मुलासोबत तुलना करतात. त्यातून विद्यार्थी तणावग्रस्त होऊन नको ते पाऊल उचलतात. मात्र, मुलांची आवड निवड जपून त्यांना हवं त्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी देणारे असे पालक कमीच असतात. चोलाचगुड्डा कुटुंबीयांनी आज निकालच्या दिवशी वेगळाच आदर्श समाजात घालून दिला आहे. त्यांचं कौतुक होत असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! पाकिस्तान हादरला, 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप; तणावपूर्ण शांततेच निसर्गाचा 'दे धक्का'

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Embed widget