Free Visa : भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'हा' देश भारतीय नागरिकांना देणार मोफत व्हिसा
जर तुम्ही श्रीलंकेला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Free Visa : जर तुम्ही श्रीलंकेला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी मोठी माहिती दिली. पायलट प्रोजेक्ट म्हणून श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने अनेक देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांच्या यादीत भारताचेही नाव समाविष्ट झाले आहे. मंत्री अली साबरी यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. भारताव्यतिरिक्त श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने चीन, मलेशिया, जपान, रशिया, इंडोनेशिया आणि थायलंडलाही मोफत व्हिसा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे नियम 31 मार्च 2024 पर्यंत तत्काळ प्रभावाने लागू राहतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी म्हणाले होते की, त्यांच्या देशाचे भारतासोबतचे संबंध आमच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात महत्त्वाचे आहेत. श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आर्थिक सुधारणांना चालना देण्यासाठी नवी दिल्लीसोबत काम करण्याच्या आपल्या सरकारच्या योजनांवरही प्रकाश टाकला. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांच्या वतीने असे सांगण्यात आले की, आम्हाला भारतीय चलनाला श्रीलंकेत व्यापार करण्यायोग्य चलन बनवण्याची परवानगी द्यायची आहे. 300 ते 400 दशलक्ष भारतीय प्रवास करत असलेल्या भारताची क्षमता आम्हाला समजते, असे श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले.
फ्री व्हिसा म्हणजे काय
या अंतर्गत तुम्ही व्हिसा न घेता कोणत्याही देशात जाऊ शकता. यासंबंधी कोणत्याही देशामध्ये करार असेल किंवा तुम्ही ज्या देशाला भेट देणार आहात त्या देशाने परदेशी नागरिकांसाठी एकतर्फी सीमा खुली केली असेल तेव्हा मोफत व्हिसा लागू होतो. आपल्याला ज्या देशात जायचे आहे, त्यांच्याकडे त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी परवानगी मागावी लागते. ते देश आपल्याला परवानगी म्हणजेच व्हिसा देतात. प्रत्येक देशाचे व्हिसा देण्याबाबतचे नियम वेगळे आहेत. आपला येण्याचा उद्देश जसे पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशी बरीचशी माहीती घेवून खात्री पटल्यावर व्हिसा देतात.
महत्त्वाच्या बातम्या: