एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट: कसं घडलं कारगील युद्ध?
मुंबई: तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वायपेयींनी कारगीलमधील ज्या सशस्त्र घुसखोरीचा उल्लेख केला, तीच पुढे जाऊन भारत पाकिस्तानमधलं चौथं युद्ध बनली. हेच ते कारगीलचं युद्ध…आजपासून 17 वर्षांपूर्वी मे 1999 ते जुलै 1999 या काळात हे कारगील युद्ध लढलं गेलं.
भारतीय सेनेनं प्रराक्रमाची पराकाष्ठा केली. जगाच्या इतिहासात पहिल्यांदांच महाविनाशक अणुबॉम्ब असलेले दोन देश युद्धाच्या मैदानात एकमेकांना भिडत होते. त्यामुळे जगासमोर अणुयुद्धाचं संकटचं उभं होतं. कारगील युद्धाच्या वर्षभर आधीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अणूचाचणी केली होती. भारताने केलेली अणूचाचणी हेच कारगील युद्धाचं मूळ कारण नव्हतं ना हा प्रश्न कारगील युद्धाच्या 17 वर्षांनंतरही अनुत्तरीत आहे.
भारत - पाक संबंध नेहेमीच ताणलेले असतात. पण 1999 च्या एका वर्षात दोन्ही देशातील संबंधानी सर्वाधिक चढउतार अनुभवले. पोखरण अणूचाचणीनंतर पाकसोबत संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी सरकारनं मोठं पाऊल उचललं.
20 फेब्रुवारी 1999
भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी लाहोरपर्यंत बसने प्रवास केला. शांती, सलोखा, मैत्रीच्या वातावरणात अनेकांना इतिहासात याआधी कमी वेळा दिसलेला आशेचा किरण दिसत होता.. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला दोन्ही देशांनी लाहोर करार जाहीर केला. यात काश्मिरसोबत इतर सर्व मुद्दे चर्चेनं सोडवण्याचा निर्णय झाला..
वाजपेयींनी पुढे केलेला शांतीचा-मैत्रीचा हात शरीफ यांनी उत्साहाने स्वीकारला खरा…पण लाहोरच्या या जल्लोषात, पाकिस्तानकडेही अणुबॉम्ब आहे… आणि याच अणुबॉम्बची भीती दाखवत पाकिस्तान काश्मिरमध्ये मोठी घातपाती योजना आखू शकतो, याचा भारताला विसर तर पडला नसेल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
पाकिस्तान लष्कराची घुसखोरी
लाहोर कराराच्या आधीच पाकिस्तान लष्करानं कारगीलमध्ये घुसखोरी केली होती. याची पूर्वकल्पना पाकिस्तानच्या पंतप्रधानांना होती का? याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. याबाबत पाकिस्तानकडून दोन मोठे गौप्यस्फोट झाले आहेत. पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार आणि पाकिस्तानमधील पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या नजम सेठी यांनी पहिला मोठा गौप्यस्फोट आपल्या टीव्ही शो मध्ये केला.
कारगील युद्धाला 17 वर्षे पूर्ण, ऐतिहासिक लढाईतील 10 गोष्टी
कारगीलवर कब्जा करणं हा या तिघांच्या जुन्याच योजनेचा भाग होता. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला होता. बेनझीर भुत्तोंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी भारतावर हल्ला करण्याची परवानगी दिली नव्हती…मात्र पाकिस्तानचे लष्करशहा अशा प्रकारच्या हल्ल्याचा कट बऱ्याच वर्षांपासून घालत होता ही गोष्ट यावरुन स्पष्ट होते. १९९९ च्या हल्ल्याला ऑपरेशन बद्र असं नाव दिलं गेलं. —****—– लडाख… जम्मू काश्मिरचा सर्वात शांत भाग असलेलं लडाख, पाकिस्तानच्या कब्जात घेणं हे ऑपरेशन बद्रचं प्रमुख लक्ष्य होतं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्ताननं ऑपरेशन बद्रचे तीन टप्पे पाडले होते. पहिल्या टप्प्यात द्रास, कारगील, बटालीकच्या पहाडांवर कब्जा करायचा आणि लडाखला बाकीच्या जम्मू-काश्मीरपासून वेगळं पाडायचं. भारतानं प्रतिहल्ला करत लढाई केली तरी काश्मिर मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व मिळेल, असा हा कट आखणाऱ्या पाकिस्तानींचा डाव होता. तसंच अणुयुद्धाला घाबरुन अमेरिका आणि इतर मोठे देश युद्धबंदी घडवून आणतील या आशेवर पाकिस्तानने ताबारेषा म्हणजेच एलओसीला वादग्रस्त ठरवणं सुरु केलं. सियाचीन ऑपरेशन बद्रचा दुसरा टप्पा होता,सियाचीनवर भारताची पकड ढिली करणं. .तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात पाकिस्तान लडाखवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार होता. कारगीलवर हल्ला करण्याचा कट आखणाऱ्या जनरल्सनी मोठी स्वप्न पाहिली होती…कारगील युद्धावेळी पाकिस्तानी एअर फोर्सचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स असणारे कैसर तुफैल यांनी आपल्या पुस्तकात १६ मेच्या एका बैठकीचा उल्लेख केला आहे. या बैठकीत पहिल्यांदाच जनरल मुशर्रफ यांचे विश्वासू लेफ्टनंट जनरल महमुद अहमद यांनी पाक सेनेच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना या कटाची माहिती दिली. महमुदने म्हटलं होतं… ऑक्टोबर महिना येऊ द्या.. सियाचीनमध्ये थंडी आणि भुकेनं व्याकूळ झालेल्या शेकडो भारतीय सैनिकांची प्रेतं आपण उचलत असू… कागदावर तरी ऑपरेशन बद्रची प्लॅनिंग एकदम भक्कम वाटत होती, पण भारताचं प्रत्युत्तर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची प्रतिक्रिया जोखण्यात पाकिस्तानी कटकारस्थानी कमी पडले…त्यामुळे पहिल्या टप्प्यातच त्यांच्या प्लॅनिंगचा फज्जा उडाला… पण भारत या युद्धासाठी तयार होता का? स्थिती आणखीनच गंभीर होत होती.. घुसखोर कश्मिरी अतिरेकी आहेत आणि त्यांचा पाक लष्कराशी कोणताही संबंध नाही असं पाकिस्तानचं पालुपद सुरुच होतं. अखेर 24 मे म्हणजे घुसखोरीची माहिती मिळाल्याच्या तब्बल 21 दिवसानंतर सीसीएस म्हणजे संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीची पहिली बैठक झाली… या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला गेला. पाकिस्ताननं बळाकवलेलं कारगील परत मिळवण्यासाठी भारत दुसऱ्या जागी एलओसी किंवा सीमारेषा उल्लंघन करेल का असा यक्ष प्रश्न उभा ठाकला होता..अशा प्रकारे एलओसी क्रॉस करणं म्हणजे दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये खुली लढाई… बहुमत गमावलेलं वाजपेयी सरकार जेव्हा वाजपेयी सरकारने कारगीलमधून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारनं बहुमत गमावलेलं होतं, देशात निवडणुकांचं वारं होतं, पण या सरकारला मोठे निर्णय घेण्यावाचून पर्याय नव्हता. सरकारनं वायुसेनेची शक्ती वापरायचा निर्णयही घेतला होता. हा अत्यंत महत्वाचा निर्णय होता…मात्र भारतीय वायुसेनेला कोणत्याही परिस्थितीत एलओसी क्रॉस करण्याची परवानगी दिली नव्हती. सुरुवातीलाच धक्के खाल्यानंतर वायुसेनेनं आपली रणनीती बदलली.. १९७१ नंतर पहिल्यांदाच वायुसेनेचे लढाऊ विमानं युद्धात भाग घेत होती.. याला ऑपरेशन सफेद सागर असं नाव दिलं गेलं..आकाशात दुसऱ्या विमानांच्या सुरक्षेची जबाबदारी मिग-29 वर होती. मिग 29 विमानांनी पाकिस्तानच्या एफ 16 विमानांना भारतीय सीमेच्या जवळपास भटकूही दिलं नाही. भारतीय वायूदलाची अचाट कामगिरी मिग २१, मिग २७ आणि मिराज-२००० ही विमानं जमिनीवर लक्ष्य शोधून मारा करत होते. आत्तापर्यंत जगातील कोणत्याही वायुदलाला करता आली नाही अशी कामगिरी भारताच्या या विमानांनी पार पाडली. या विमानांनी १३ हजार ते १८ हजार फूट उंचीवर लपून बसलेल्या पाकिस्तानच्या सैन्याला निवडून टिपून काढलं. पहिल्यांदाच लेझर गायडेड बॉम्बचा वापर केला गेला. भारताने कारगील घुसखोरीत पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाचे भक्कम पुरावे जगाच्या समोर मांडले… तोलोलिंगवर ताबा मिळवल्यावरच भारतीय सैन्यासाठी जमिनीवर परिस्थिती काहीशी सुधारली पाकिस्तानला घेरण्यासाठी भारताने अनेक आघाड्यांवर लढा सुरु ठेवला. एकीकडे मुत्सद्दी त्यांचं काम करत होते तर दुसरीकडे दिल्लीत वायुसेना, लष्कर आणि परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते पत्रकार परिषदा घेत होते, टेलिव्हिजन चॅनल हे युद्ध घराघरात पोहोचवत होते. भारतीय जवान कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत लढतोय ते सारा देश बघत होता. हे टेलिव्हीजन युगातलं पहिलं युद्ध होतं. यातील काही लढाया आणि त्यातले काही पराक्रमी योद्धे देशवासियांच्या आजही लक्षात आहेत. ही कहाणी आहे एक तरुण… कॅप्टन विक्रम बत्राची… हे जवान जम्मू कश्मिर लाईट इन्फंट्रीचे आहेत… द्रासच्या पॉईंट ५१४० च्या एका मोक्याच्या चौकीवर ताबा मिळवून परततानाची त्यांची ही दृश्य एबीपी न्यूजनं टिपली होती. विक्रमला त्यांचे मित्र शेर शाह नावानं बोलवायचे.. शत्रुसुद्धा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होता… विक्रम बत्रा आणि त्यांच्या साथीदारांचं मिशन अजून संपलेल नव्हतं. त्यांनी पुन्हा जोमानं चढाई सुरु केली… जबरदस्त धुमश्चक्रीनंतर विजय मिळाला… पाईंट 5140 वर तिरंगा फडकला… मात्र विजय साजरा करण्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा नव्हते. आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. हे पहिलं असं युद्ध होतं जिथे शहिदांचं पार्थिव अंत्यविधीसाठी त्यांच्या गावात पोहोचवलं गेलं. हा निर्णय फार मोठा ठरला, त्यामुळे ही लढाई कारगीलपर्यंत मर्यादित राहीली नाही, लडाख पासून ते केरळपर्यंत आणि राजस्थानपासून ते नागालँड- मणीपूर पर्यंत कारगीलचं वास्तव पोहोचलं. सगळा देशच जणू कारगिलशी जोडला गेला. तिकडे पाकिस्तानने मात्र आपल्या शहिद जवानांचे मृतदेह नाकारणं सुरुच ठेवलं. भारताच्या मोर्चेबांधणीमुळे परेशान पाकिस्ताननं एक नवा डाव टाकला…पाकिस्तान अणूयुद्धाच्या वल्गना करु लागला…31 मे 1999 रोजी भारतानं युद्ध वाढवलं तर पाकिस्तान सर्व अस्त्रांचा वापर करेल अशी धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव शमशाद अहमद यांनी दिली भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचा हा डावपेच होता, तो भारतानं झुगारुन लावला .त्यानंतर चर्चेचं पिल्लू सोडण्यात आलं. पंतप्रधानांनी याचं उत्तर देशाला संबोधून केलेल्या भाषणात दिलं…या दरम्यान आणखी एक गौप्यस्फोट झाला… पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी भारतान ते पाऊल उचललं जे आत्तापर्यंत कधीच उचललं नव्हतं.. ११ जून १९९९ परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी एक पत्रकार परिषद बोलावली… यात एक टेप रेकॉर्डिंग ऐकवली गेली…पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ आणि चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद अझीज या दोघांमधील हे संभाषण होतं…मुशर्ऱफ चीनमध्ये होते तर अझीज इस्लामाबादेत… 11 जूनला संभाषण जगानं ऐकलं आणि 12 जूनला सरताज अझीज दिल्लीत दाखल झाले. वातावरणात तणाव स्पष्ट जाणवत होता…बैठक निष्फळ ठरली… पाकिस्तानचे अमेरिकेच्या मदतीकडे डोळे चीन दौरा आटोपून आलेले नवाज शरीफ अमेरिकेच्या मदतीकडे डोळे लावून बसले. १९९९ मध्ये ब्रुस रिडल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात मोठे अधिकारी होते… रिडल यांनी कारगील युद्धाच्या काळात अमेरिकेच्या रणनीतीबाबतचा एक पेपर सादर केला होता. रिडल यांच्या म्हणण्यानुसार, नवाज शरीफ जूनच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बिल क्लिंटन यांच्या भेटीचा प्रस्ताव देत होते, कारगील युद्धात अमेरिकेनं हस्तक्षेप करावा अशी मागणी शरीफ यांनी केली होती. उत्तरादाखल बिल क्लिंटन यांनी साफ सांगितलं की आधी पाकिस्ताननं कारगीलमधून सैन्य माघारी घ्यावं …आणि लाहोर शांती कराराला पुढं न्यावं. नवाज शरीफ यांच्याशी बोलणं झाल्यानंतर बिल क्लिंटन यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना फोन केला… कारगीलमध्ये पाकिस्तान उरली सुरली लाज वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता…पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना पराजयाची जबाबदारी नको होती… नवाज शरीफनी ३ जून रोजी बिल क्लिंटन यांना पुन्हा फोन केला…रिडल यांच्या म्हणण्यानुसार शरीफ फोनवर एकदम हताश वाटत होते…ते व्हाईट हाऊसवर येऊन एकट्या क्लिंटनना भेटण्यासाठी वेळ मागत होते…क्लिंटन यांना शरीफना साफ सांगितलं, भारतीय हद्दीतून बाहेर या… जर तुम्ही सैन्य माघारी बोलावणार नसाल तर अमेरिकेला यायची आवश्यकता नाही… तरीही नवाज शरीफ न बोलावता अमेरिकेत पोहोचले, ते सुद्धा सरकारी विमानाने नाही तर खाजगी विमानाने… त्यामुळेच अमेरिका विचारात पडला की नवाज शरिफ कारगील युद्ध संपवण्यासाठी नाही तर पॉलिटिकल असायलम.. म्हणजेच राजकीय आश्रय घ्यायला तर आले नाहीत? नवाज शरीफ ४ जुलैला अमेरिकेत पोहोचले.. भेटीच्या सुरुवातीलाच क्लिंटन यांनी काही फोटो शरीफ यांच्या समोर ठेवले.. हे फोटो होते पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे… ज्यात शरीफ यांना अंधारात ठेवून पाक लष्कर ही अण्वस्त्र दुसरीकडे हलवत होतं. वाजपेयींची ठाम भूमिका व्हाईट हाऊसमधली ही भेट बरीच लांबली, पाकिस्तानने कारगिलमधील सैन्य बिनशर्त मागे घ्यावं किंवा युद्धाचं सर्व अपश्रेय पाकिस्तानच्या माथी येईल असं क्लिंटन यांनी पुन्हा शरीफना स्पष्ट सांगितलं. विचार विनिमय करण्यासाठी बैठक काही काळ थांबवली गेली. याच दरम्यान भेटीचा तपशील सांगण्यासाठी क्लिंटननी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना फोन केला. जोवर भारतीय भूमीवर घुसखोर जिवंत आहेत तोवर युद्ध थांबणार नाही असं भारताकडून निक्षून सांगितलं गेलं.. काही वेळानंतर पुन्हा शरीफ आणि क्लिंटन भेटले, तेव्हा सुद्धा क्लिंटन यांनी फक्त ब्रुस रिडल यांना बैठकीच्या खोलीत थांबवून घेतलं… या बैठकीत न ठरलेल्या गोष्टी शरीफ विपर्यास करुन बाहेर सांगतील अशी भीती क्लिंटन यांना वाटली असावी. अखेर पाकिस्तान बधलं कारगीलमध्ये आपले ४५३ सैनिक मारले गेल्याचं अखेर पाकिस्तानने मान्य केलं पण त्यासाठी २०१० साल उजाडावं लागलं.. नवाज शरीफ यांनी तर हा आकडा चार हजार असल्याचं सांगितलं होतं.. यातून पाकिस्ताननं काय मिळवलं हा प्रश्न आजही तिकडे विचारला जातोय… तर अणुचाचण्या करुनही युद्धाची वेळ का आली हा प्रश्न भारताला भेडसावत राहीला…१३० स्केअर किलोमीटर भूभागावर पाकिस्तानने कब्जा केला होता…घुसखोरी इतकी आतवर आणि भयानक आहे आणि हे कळायलाही १०० सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली…असं का झालं… अणुबॉम्ब तयार केल्यानंतर कोणताही देश भारतावर हल्ला करणार नाही..या भ्रमात तर आपण नव्हतो ना?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement