एक्स्प्लोर

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदचं स्मृती ईराणींकडून कौतुक

सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला.

मुंबई : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने जवळ पैसे नसल्याने अनेकांनी पायी, काहींनी सायकलवर तर काहींनी मिळेल त्या साधनाच्या मदतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या मजुरांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने पुढे येऊन अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनूच्या या कामाची प्रशंसा केली.

सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचं आश्वासन दिलं. अशा एका ट्वीटला स्मृती इराणी यांनी रिट्वीट करत रिप्लाय दिला आहे.

स्मृती इराणी यांनी म्हटलं की, "सोनू हे माझं भाग्य आहे की मी एक प्रोफेशनल सहकारी म्हणून तुम्हाला गेल्या दोन दशकांपासून ओळखते. अभिनेता म्हणून तुमची प्रगती पाहून आनंद झाला. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत तुम्ही जी दानशूर वृत्ती दाखवली, त्याबद्दल मला तुमच्यावर जास्त गर्व आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल तुमचे धन्यवाद."

सोनूने देखील स्मृती इराणी यांच्या ट्वीटला उत्तर देत म्हटलं की, "धन्यवाद, तुम्ही नेहमी प्रेरणादायी आहात. तुमच्या स्तुतीमुळे मेहनत करण्याची आणखी प्रेरणा मिळाली आहे. जोपर्यंत आपले प्रत्येक भाऊ-बहीण सुखरुप घरी पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी सोबत असेन."

सोनूचं काम इतकं वाऱ्यासारखं पसरलंय की मुंबईतल्या कोपऱ्यातून कुठूनही सोनूला टॅग करून लोक आपण अडकलो असल्याचं सांगू लागले. शक्य त्या सगळ्यांना सोनूही रिप्लाय देऊ लागला.
कुणीतरी आपल्या मामाची कैफियत घेऊन येतो, त्यावर सोनूचा रिप्लाय असतो,
मामा से कहना आप भांजे के बजह से घर जा रहे हो..
कुणीतरी आई बाबा एकटे असल्याचं सागतं.. मग लगेच सोनूचा रिप्लाय येतो
अम्मी अब्बू से कह दो जल्दी मिलते है.. नंबर भेजो..
कुणीतरी अडकलेला सोनूला टॅग करून आपली परिस्थिती सांगतो.. तर त्याचा रिप्लाय असतो असा.. परेशानी गई तेल लेने.. मुस्कुराए.. आप जल्दी घर जाएंगे..
असे शेकडो मेसेड सोनूच्या वॉलवर सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील, स्मृति इराणी यांच्यांसह अनेकजण सोनूचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडमध्ये खलनायक भूमिका साकारणारा सोनू सध्या तरी अनेकांसाठी हिरो बनला आहे.

CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले

महत्त्वाच्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
Sharad Pawar : शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Anant Ambani Visits Govardhan : अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget