एक्स्प्लोर
राष्ट्रपती निवडणुकीची खलबतं, सोनिया गांधींनी बोलावली देशभरातील 17 विरोधी पक्षांची बैठक
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज 17 विरोधी पक्षांना स्नेहभोजनासाठी बोलावलं. यादरम्यान राष्ट्रपतीपदाच्या उमेदावारावर चर्चा झाली. संसद परिसरातील लायब्ररीत या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपतीपदासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकही रणनीती आखत आहेत. हेच डोळ्यांसमोर ठेवून सोनिया गांधींनी बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत कोण-कोणते पक्ष सहभागी?
काँग्रेस, बीएसपी, आरजेडी, जेडीयू, एसपी, जेएमएम, टीएमसी, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस, डीएमके, एनसीपी, आरएसपी, एआययूडीएप, ऑल इंडिया मुस्लीम लीग. सीपीएम, जेडीएस, सीपीआय यांसह 17 पक्ष सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी पोहोचले आहेत.
कोणत्या नेत्यांची उपस्थिती?
सोनिया गांधींसह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बीएसपीच्या अध्यक्षा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, सीपीएम नेते सीतारा येचुरी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, जेडीयू नेते शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्स ओमर अब्दुल्ला, जेडीयू नेते के. सी. त्यागी आणि समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी शरद यादव आले होते. विरोधी पक्षांच्या या चर्चेद्वारे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार उतरवण्यासाठी चाचपणी केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement