एक्स्प्लोर
LoC वर सुरुंग स्फोट, एक जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील एलओसीवरील सुरुंग स्फोटात एक जवान जखमी झाला आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी याबाबत माहिती दिली. पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये सुरुंग स्फोट झाल्याची माहितीही मेहता यांनी दिली. भारतीय जवानाने सुरुंग स्फोटापासून बचाव करणारे बूट परिधान केले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उधमपूरमधील हॉस्पिटलमध्ये जवानावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी रोखण्याच्या उद्देशाने सैन्याकडून काही संवेदनशील ठिकाणी सुरुंग लावले जातात.
आणखी वाचा























