एक्स्प्लोर
अकाली दल हरियाणात स्वबळावर निवडणूक लढणार
शिरोमणी अकाली दलने हरियाणामध्ये 2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. शिरोमणी अकाली दल हा एनडीएचा जुना मित्रपक्ष आहे.
चंदीगड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच भाजपप्रणित एनडीएसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. शिरोमणी अकाली दलाने हरियाणामध्ये 2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
शिरोमणी अकाली दल हा एनडीएचा जुना मित्रपक्ष आहे. अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी हा स्वबळाचा नारा दिला. पंजाबमध्ये आम्ही वचन दिलं असून ते पूर्ण केलं. आता हरियाणाच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यासाठी सज्ज आहोत, असं सुखबीर सिंह बादल यांनी कुरुक्षेत्र येथील सभेत जाहीर केलं.
अकाली दलच्या झेंड्याखाली एकत्र येत एक नवा इतिहास लिहिण्याचं आवाहन सुखबीर सिंह बादल यांनी केलं. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल सत्तेत एकत्र होते.Shiromani Akali Dal will contest the 2019 elections independently in Haryana and emerge victorious: Sukhbir Singh Badal, Shiromani Akali Dal President in Kurukshetra, Haryana pic.twitter.com/oXdMwZ5feL
— ANI (@ANI) August 19, 2018
अकाली दल हा पंजाबमधील मोठा पक्ष आहे. एकीकडे विरोधक एकवटत असताना एनडीएतील एका महत्त्वाच्या मित्रपक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. यापूर्वीच शिवसेनेनेही स्वबळाचा नारा दिला आहे. तर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष टीडीपीनेही एनडीएसोबत फारकत घेतली आहे.We have promised&delivered in Punjab. Now we're ready to take up the responsibility of working for welfare of people of Haryana. I appeal to Punjabis to unite under the flag of SAD to script a new history in Haryana: Sukhbir Singh Badal, Shiromani Akali Dal (SAD) Pres in Haryana pic.twitter.com/BILwVJFxyw
— ANI (@ANI) August 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement