Visakhapatnam : जगातील सर्वात मोठ्या माशाचे प्राण वाचवण्यात मच्छिमारांसह वनविभागाला यश...
मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलेल्या जगातील सर्वात मोठ्या व्हेल शार्क माशाचे प्राण वाचवण्यात वनविभागाला यश आले आहे. विशाखापट्टणम येथील तांटडी समुद्रकिनाऱ्यावरील जाळ्यात हा व्हेल अडकला होता.
![Visakhapatnam : जगातील सर्वात मोठ्या माशाचे प्राण वाचवण्यात मच्छिमारांसह वनविभागाला यश... shark entangled in fishing net rescued in visakhapatnam Visakhapatnam : जगातील सर्वात मोठ्या माशाचे प्राण वाचवण्यात मच्छिमारांसह वनविभागाला यश...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/10a8843f331f01fff9ad1968faffb56a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील तांटडी समुद्रकिनाऱ्यावर जाळ्यात जगातील सर्वात मोठा शार्क मासा अडकला होता. मात्र, स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीव रक्षकांनी त्याचे प्राण वाचवले असून, त्याला समुद्रात सोडण्यात आले आहे. जिल्हा वन अधिकारी अनंत शंकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जाळ्यात अडकलेल्या शार्क माश्याचे वजन हे २ टन होते. या शार्क माशाला यशस्वीरित्या जाळ्यातून सोडवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी दक्षता घेतली होती. वनविभाग, मच्छिमार आणि वन्यजीव संरक्षक यांच्या समन्वयाने शार्कला खोल समुद्रात सोडण्यात आले आहे. व्हेल शार्क हा जगातील सर्वात मोठा मासा आहे. या शार्क माशांच्या प्रजाती सध्या धोक्यात आल्या असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. शार्क मासे ओळखण्यासाठी आता मालदीव व्हेल शार्क संशोधन कार्यक्रम राबविला जात आहे. यामुळे माश्यांच्या हालचाली, त्यांच्या प्रजाती याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल असे वन अधिकारी अनंत शंकर म्हणाले.
आता जर समुद्रात जाळ्यात अशा प्रकारे मोठे मासे अडकले तर माशांचा बचाव करण्यासाठी मच्छीमारांना थेट वनविभागाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. जेणेकरुन माशांची सुरक्षीतपणे सुटका होईल. कारण मोठे मासे ज्यावेळी जाळ्यात अडकतात, त्यावेळी त्यांनी बाहेर काढणे खूप अवघड असते. यावेळी वेळेत त्या माशांची सुटका करणे गरजेचे असते. व्हेल शार्क मासा जर माच्छिमारांच्या जाळ्यात अडकला आणि तो बाहेर काढताना जाळीचे कोणतेही नुकसान होणार नाही. जर मच्छिमारांच्या जाळीचे नुकसान झाले तर त्यांना भरपाई दिली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)