'Phantom of Bombay House' पालनजी मिस्त्री यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shapoorji Pallonji Group Chairman Pallonji Mistry Passed Away : 'Phantom of Bombay House' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक पालनजी मिस्त्री यांचं निधन झालं असून ते 93 वर्षांचे आहेत.
Shapoorji Pallonji Group Chairman Pallonji Mistry Passed Away : शापूरजी पालनजी (Shapoorji Pallonji) समूहाचे अध्यक्ष पालनजी मिस्त्री यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. पालनजी मिस्त्री यांचा जन्म भारतात पारशी कुटुंबात झाला होता. त्यानंतर त्यांनी 2003 मध्ये लग्न करून आयरिश नागरिकत्व स्विकारलं. ते टाटा सन्समधील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. त्यांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्क्यांची भागीदारी होती. पालनजी मिस्त्री शापूरजी पालोनजी ग्रुपचं काम पाहत होते.
मिस्त्री यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी पात्सी पेरिन दुबाश आणि चार मुलं आहेत. त्यांची दोन मुलं शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री, दोन मुली लैला मिस्त्री आणि आलू मिस्त्री. मिस्त्री 1947 मध्ये कंपनीत सामील झाले. त्यांच्या नेतृत्त्वात 1970 मध्ये अबूधाबी, कतार आणि दुबईसह मध्य पूर्वेत कंपनीचा विस्तार झाला. 1971 मध्ये पालनजी मिस्त्री यांच्या नेतृतत्वात कंपनीनं ओमानच्या सुलतानचा राजवाडा आणि तिथे अनेक मंत्रालयीन इमारती बांधण्याचं कंत्राट मिळवलं होतं.
Phantom of Bombay House अशी ओळख
2016 मध्ये, त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मिस्त्रींना 'Phantom of Bombay House' म्हणून ओळखलं जात होतं.
जगातील 41वी श्रीमंत व्यक्ती
पालनजी मिस्त्री यांचा मोठा मुलगा शापूरजी मिस्त्री हे शापूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. तर, त्यांचा धाकटा मुलगा सायरस मिस्त्री 2012 ते 2016 या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. ब्लूमबर्गकडून जारी केल्या जाणाऱ्या अब्जाधीश निर्देशांकानुसार, मिस्त्री हे 28.9 डॉलर अब्ज संपत्तीसह जगातील 41वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
कोण आहेत पालनजी मिस्त्री?
मिस्त्री यांचा जन्म 1929 मध्ये भारतातील एका पारसी कुटुंबात झाला.
1947 मध्ये, वयाच्या 18 व्या वर्षी, ते त्यांच्या कुटुंबाच्या बांधकाम व्यवसायात सामील झाले. हा व्यवसाय त्यांच्या आजोबांनी 1865 मध्ये सुरू केला होता. शापूरजी पालनजी कंपनीचे टाटा समूहाशीही जवळचे संबंध होते.
हळूहळू, त्याच्या कंपनीनं मध्य पूर्वमध्ये आपला व्यवसाय वाढविला आणि 1972 मध्ये ओमानच्या सुलतानसाठी अल आलम पॅलेसचे बांधकाम पूर्ण केलं.
2003 मध्ये, पालनजी मिस्त्री यांनी पात्सी पेरिन दुबाश यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी नागरिकत्व स्विकारलं.
2011 मध्ये त्यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती 28.9 डॉलर अब्ज होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो 41 व्या स्थानावर आहेत.