एक्स्प्लोर
बायकोला विका, शौचालय बांधा, दंडाधिकाऱ्याची जीभ घसरली
'कोणाला 12 हजारांच्या मोबदल्यात आपल्या पत्नीवर बलात्कार होऊ द्यायचा आहे का? बायकोला विका, शौचालय बांधा' अशी संतापजनक भाषा बिहारमधील औरंगाबादचे दंडाधिकारी कंवल तनुज यांनी वापरली आहे.
![बायकोला विका, शौचालय बांधा, दंडाधिकाऱ्याची जीभ घसरली Sell Your Wife If You Dont Have Money To Build Toilet Bihar Dm Kanwal Tanuj Tells Villagers Latest Update बायकोला विका, शौचालय बांधा, दंडाधिकाऱ्याची जीभ घसरली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24135943/Bihar-toilet-Magistrate.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पाटणा : बिहारमधील एका गरीब इसमानं घरात शौचालयाची मागणी केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्याने अत्यंत उर्मट उत्तर दिलं आहे. 'बायकोला विक आणि शौचालय बांध' असं संतापजनक उत्तर बिहारमधील औरंगाबादचे दंडाधिकारी कंवल तनुज यांनी दिलं आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दंडाधिकारी शौचालयाचं महत्त्व सांगण्यासाठी गावात आले होते. 'महिला शौचासाठी उघड्यावर जातात. त्यामुळे त्यांच्यावर बलात्कार किंवा अतिप्रसंग होतात. शौचालय बांधण्यासाठी केवळ 12 हजार रुपये लागतात. स्त्रियांच्या चारित्र्यापेक्षा ही रक्कम मोठी आहे का?, असं दंडाधिकारी म्हणाले.
'कोणाला 12 हजारांच्या मोबदल्यात आपल्या पत्नीवर बलात्कार होऊ द्यायचा आहे का? माझ्या पत्नीची इज्जत लूट आणि मला 12 हजार रुपये दे. असं कोणी गरीब माणूस मला सांगेल का, तुमची जर हीच मानसिकता असेल तर बायकोचा लिलाव करा किंवा तिला विकून टाका' असं ते म्हणाले.
दरम्यान, समाजवादी पक्षाने आयएएस अधिकारी कंवल तनुज यांच्यावर कारवाईची मागणी नितीश सरकारकडे केली आहे.
https://twitter.com/ani_digital/status/889133132825231360
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)