एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या शाळेत भारतीय गाण्यासोबत तिरंगा फडकवला, शाळेची मान्यता रद्द
भारतीय गाण्यावरील नृत्याचा व्हिडीओ पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर स्थानिकांनी या शाळेची तक्रार केल्याने डायरेक्टोरेट ऑफ इन्स्पेक्शन एँड रजिस्ट्रेशन ऑफ प्रायव्हेट इंस्टिट्यूट्स (DIRPIS)ने शाळेवर कारवाई करत मान्यता रद्द केली.
![पाकिस्तानच्या शाळेत भारतीय गाण्यासोबत तिरंगा फडकवला, शाळेची मान्यता रद्द school's approval canceled, because student's performing with Indian song in Pakistan पाकिस्तानच्या शाळेत भारतीय गाण्यासोबत तिरंगा फडकवला, शाळेची मान्यता रद्द](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/16145859/indian-songs.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या एका शाळेतील कार्यक्रमाच्या सादरीकरणात भारताचं गाणं वाजवल्याने शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या सादरीकरणावेळी भारतीय गाण्यासोबत तिरंगाही फडकवण्यात आला होता.
कराची येथील ममा बेबी केअर कँब्रिज स्कूलमध्ये लहान मुलांचं सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमातील एका सादरीकरणामुळे शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. लहान विद्यार्थ्यांनी भारतीय गाण्यावर नृत्य सादर केलं होतं. शिवाय मागे भारतीय ध्वजही फडकण्यात आलं होतं. त्यामुळे या शाळेवर कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय गाण्यावरील नृत्याचा व्हिडीओ पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर स्थानिकांनी या शाळेची तक्रार केल्याने डायरेक्टोरेट ऑफ इन्स्पेक्शन एँड रजिस्ट्रेशन ऑफ प्रायव्हेट इंस्टिट्यूट्स ( DIRPIS)ने शाळेवर कारवाई करत मान्यता रद्द केली. शाळेतील कार्यक्रम पाकिस्तानच्या विरोधातलं आहे. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली, असं DIRPISच्या रजिस्ट्रार राफिया जावेद म्हणाल्या.
दोन दिवसापूर्वी काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद स्वीकारली होती. त्यानंतर भारतात बदल्याची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवाद्यांना याची किंमत चुकवावी लागणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन देशातील संबंध अजुन बिघडण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)