एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

60 दिवसांच्या आत 'त्या' प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट उभारा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

देशभरात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा फैसला सुनावला आहे.

नवी दिल्ली : देशभरात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा फैसला सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाची 100 पेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट बनवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 60 दिवसांच्या आत ही पॉक्सो न्यायालय उभारावी, असे आदेश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. ही न्यायालय केवळ अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराबाबतच्या खटल्यांवर सुनावणी घेतील. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 2012 मध्ये संसदेने 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस' (पॉक्सो)हा कायदा पास केला होता. या कायद्यानुसार फक्त अत्याचार करणाराच नाही तर ज्याला अत्याचाराची माहिती आहे, परंतु तो तक्रार दाखल करत नाही तोदेखील आरोपी आहे. मुलांवर अत्याचार करणे, बलात्कार करणे, तसेच त्याची अश्लील चित्रफीत बनवणारादेखील गुन्ह्यास पात्र आहे. देशभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 100 हून अधिक आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये विशेष पोलिसांची टीम बनवण्याची, जिल्ह्यात विशेष कोर्ट बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 60 दिवसांच्या आत विशेष पॉक्सो कोर्ट उभारण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील प्रलंबित पॉक्सो खटल्यांचा अहवाल सुप्रीम कोर्टाने मागवला होती. या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की, मागील सहा महिन्यात देशभरात पॉक्सो अंतर्गत 24 हजार 212 एफआयआर दाखल झाले आहेत. त्यापैकी केवळ 6 हजार 449 गुन्ह्यांचे खटले सुरु झाले आहेत. मागील वर्षभरातील आकडेवारी पाहिल्यानंतर लक्षात आले की, पॉक्सोअंतर्गत असलेली एक लाखाहून अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत. एकट्या उत्तर प्रदेश राज्यात 44 हजार 376 खटले प्रलंबित आहेत. तर ओदिशामध्ये केवळ 12 टक्के प्रकरणांचा निकला लागला आहेत. इतर राज्यांची परिस्थितीदेखील सारखीच आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला कठोर पावलं उचलावी लागली आहेत. पॉक्सो कायद्याविषयी... लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी 2012 साली पॉक्सो कायदा पास करण्यात आला. विशेष न्यायालयात याची सुनावणी चालवणे, तसेच एका वर्षाच्या आत सुनावणी संपवून गुन्हेगारास शिक्षा देणे पॉक्सो अंतर्गत कमीत कमी 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, तर जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची चित्रफीत तयार करणाऱ्यास वेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget