एक्स्प्लोर

Savitribai Phule : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी; जाणून घ्या त्यांची कारकीर्द

Savitribai Phule Death Anniversary : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे.

Savitribai Phule Death Anniversary : सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्याच सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी (Death Anniversary) आहे. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.

भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली. 

ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या. 

सावित्रीबाई फुले यांची कारकीर्द 

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलीसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलीसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलीसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलीसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Embed widget