एक्स्प्लोर

Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

Important Days in March 2023 : अवघ्या दोन दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. मार्च महिना म्हटला की होळी, धूलिवंदन हे सण डोळ्यांसमोर येतात.

Important Days in March 2023 : अवघ्या दोन दिवसांवर मार्च (March) महिना येऊन ठेपला आहे. मार्च महिना म्हटला की होळी, धूलिवंदन हे सण डोळ्यांसमोर येतात. जगभरातील सर्व महिलांचा, मुलींचा हक्काचा दिवस जागतिक महिला दिन देखील मार्च महिन्यातच येतो. याचबरोबर अनेक महत्त्वाचे दिवस मार्च महिन्यात साजरे केले जातात. तसेच मार्च महिन्यातील प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? चला जाणून घेऊयात. 

1 मार्च : जागतिक नागरी संरक्षण दिन (World Civil Defence Day) 

जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक नागरिकांचे नागरी संरक्षणाचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटनेने (ICDO) 1990 मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता तसेच नागरी संस्था, उद्योगधंदे, वसाहती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाने आणि शासकीय साहाय्याने उभारलेली व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षणव्यवस्था. 

1 मार्च : शून्य भेदभाव विरहित दिन (Zero Discrimination Day) 

शून्य भेदभाव विरहित दिन (Zero Discrimination Day) दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक स्तरावर हा दिन साजरा केला जातो. प्रत्येकाने वय, लिंग, वंश, त्वचेचा रंग, उंची, वजन इत्यादींचा विचार न करता सन्मानाने जीवन जगावे यासाठी हा दिन साजरा केला जातो. सर्वप्रथम, 1 मार्च 2014 रोजी UN ने हा दिवस साजरा केला होता.

1 मार्च : वसंतदादा पाटील पुण्यतिथी

सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा 1977 ते 1985 या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे चार वर्ष त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. 

2 मार्च :  डॉ. काशिनाथ घाणेकर - पुण्यतिथी

डॉ. काशिनाथ घाणेकर - (14 सप्टेंबर 1930 - 2 मार्च 1986) डॉ. काशीनाथ घाणेकर यांचे मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदान होते. मराठीशिवाय त्यांनी ‘अभिलाशा’सारख्या हिंदी चित्रपटांत देखील उत्तम अभिनय केला. डॉ. काशीनाथ घाणेकर हे व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजी महाराजाच्या भूमिकेने ते एक लोकप्रिय अभिनेते झाले. 

2 मार्च : टायगर श्रॉफ जन्मदिन 

बॉलिवूडमधील अॅक्शन हिरो म्हणून टायगर श्रॉफला ओळखलं जातं. बागी, हिरोपंती, वॉर, स्टुडंट ऑफ द हिअर 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये टायगरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टायगरच्या बाबतीतल विशेष म्हणजे तो चित्रपटातील त्याचे अॅक्शन स्टंट स्वत: करतो.

3 मार्च : जागतिक वाईल्डलाईफ दिन (World Wildlife Day) 

जागतिक वाईल्डलाईफ दिन हा दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातो. वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या वातावरण बदलाच्या संकटाचा पृथ्वीवरील सजीवांना मोठा सामना करावा लागतोय. प्राणी आणि वन्य जीवनावर असलेला धोका लक्षात घेता 2013 साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी 3 मार्च हा जागतिक वर्ल्डलाईफ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्या माध्यमातून पृथ्वीवरच्या प्राणी आणि वनस्पती जीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

3 मार्च : जागतिक श्रवण दिन (World Hearing Day) 

जागतिक श्रवण दिन दरवर्षी 3 मार्च रोजी बहिरेपणा कसा टाळता येईल याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरात श्रवणशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. अनेक सामाजिक उपक्रम या दिवशी राबवले जातात.

4 मार्च :  राष्ट्रीय सुरक्षा दिन (National Safety Day) 

भारतामध्ये 4 मार्च रोजी नॅशनल सेफ्टी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस लोकांना आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या आणि लोक त्यांच्या जीवनात भेडसावत असलेल्या इतर समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साजरा केला जातो.

4 मार्च : कर्मचारी प्रशंसा दिन (Employee Appreciation Day)

4 मार्च रोजी कर्मचारी प्रशंसा दिन साजरा केला जातो. कोणत्याही यशस्वी व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांशी असलेला संबंध मजबूत असणे महत्त्वाचे आहे. याचं महत्व पटवून देणारा हा दिवस. 

6 मार्च : होळी (Holi)


Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

होळी हा एक प्राचीन हिंदू सण आहे आणि या उत्सवाला रंगांचा उत्सव, प्रेमाचा उत्सव आणि वसंत उत्सव म्हणून देखील ओळखले जाते. भगवान विष्णूंचा नरसिंह नारायण म्हणून हिरण्यकश्यपू या दृष्ट राजावर विजय मिळवला होता आणि त्यावेळीपासून हा सण साजरा केला जातो. होळी हा सण हिवाळा संपल्यानंतर आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस साजरा केला जातो.

7 मार्च : धूलिवंदन 


Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

धूलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.

8 मार्च : जागतिक महिला दिन (International Women's Day)

हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच, लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो. 

10 मार्च : शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) 

हिंदवी स्वराज्याचे सम्राट असे नाव ज्यांच्या कारकीर्दीने कोरले गेले ते शिवाजी महाराज. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना रयतेचा राजा म्हटलं जातं. देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. दरवर्षी शिवप्रेमी मोठ्या आतुरतेने आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. मात्र शिवप्रेमींमध्ये वेगवेगळे गट आहेत. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. मार्च महिन्यातील शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाणार आहे. शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जाते. 

10 मार्च : सीआईएसएफ स्थापना दिन (CISF Raising Day)

सीआईएसएफ स्थापना दिन दरवर्षी 10 मार्च दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1969 साली या दलाची स्थापना झाली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयामध्ये 10 मार्च दिवशी जोषपूर्ण वातावरणामध्ये सीआईएसएफ दिवस साजरा केला जातो. 

10 मार्च : सावित्रीबाई फुले पुण्यतिथी 

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.

11 मार्च : संकष्ट चतुर्थी 


Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

मार्च महिन्यात दोन चतुर्थी येतात. पहिली संकष्टी चतुर्थी आणि दुसरी विनायक चतुर्थी. संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षात येते आणि विनायकी शुक्ल पक्षात येते. दोन्ही चतुर्थी गणपतीला समर्पित आहेत. या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीवर श्रीगणेश कृपा करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटं संपतात. याशिवाय स्त्रिया सुख, शांती, समृद्धी आणि संतानप्राप्तीच्या इच्छेने हा उपवास करतात.

12 मार्च : रंगपंचमी 

रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

14 मार्च : Pi Day

14 मार्च रोजी जगभरात 'पाय डे' साजरा केला जातो. पाय हे गणितामध्ये स्थिरांक दर्शवण्यासाठी वापरलेले प्रतीक आहे. हे वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाचे गुणोत्तर आहे जे अंदाजे आहे. 3.14 इतके आहे. 

14 मार्च : अल्बर्ट आइन्स्टाईन (Albert Einstein Birth Anniversary)

अल्बर्ट आइन्स्टाईन - (14 मार्च 1879- 18 एप्रिल 1955) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धांन्त, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि “त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी” इ.स. 1921 साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

15 मार्च : आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन (World Consumer Rights Day) 

दरवर्षी 15 मार्च रोजी ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी पाळला जातो. हा दिवस सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर करण्यासाठी तसेच ग्राहक फसवणूक यांसारखे प्रकार रोखण्यासाठी साजरा केला जातो. 

16 मार्च : राष्ट्रीय लसीकरण दिन (National Vaccination Day)

दरवर्षी 16 मार्च रोजी भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. जो राष्ट्रीय लसीकरण दिवस (IMD) म्हणूनही ओळखला जातो. 16 मार्च 1995 रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला तेव्हा हे पहिल्यांदा दिसून आले. पोलिओच्या लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे.

18 मार्च : जागतिक निद्रा दिन (World Sleep Day)

'वर्ल्ड स्लीप डे' हा दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्‍या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी 18 मार्च म्हणजेच 'जागतिक निद्रा दिन' साजरा केला जातो. पहिल्यांदा निद्रा दिन 2008 मध्ये साजरा करण्यात आला. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. 

20 मार्च : आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness)

आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. 2013 पासून, संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील लोकांच्या जीवनातील आनंदाचं महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला आहे. या दिवशी आनंदी कसं राहावं, कोणत्या गोष्टीत आनंद मानून घ्यावा, समाधानी कसं असावं यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 

20 मार्च : जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day)

चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 20 मार्च रोजी जगभरात जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. हा दिवस चिमण्यांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. चिमण्यांबद्दल प्रेम पसरवणे, त्यांच्या जीवनातील महत्त्वाबद्दल जागरूकता इ. या दिनाचं उद्दिष्ट आहे. 

21 मार्च : जागतिक वनीकरण दिन (World Forestry Day)

21 मार्च रोजी, पृथ्वीवरील जीवन चक्र संतुलित करण्यासाठी जंगलांची मूल्ये, महत्त्व आणि योगदान याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक वनीकरण दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा केला जातो. 1971 मध्ये, युरोपियन कन्फेडरेशन ऑफ अॅग्रिकल्चरच्या 23 व्या आमसभेत जागतिक वनीकरण दिनाची स्थापना करण्यात आली होती.

21 मार्च : जागतिक कविता दिन (World Poetry Day)

21 मार्च रोजी, मानवी मनातील सर्जनशील भावना व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या 30 व्या अधिवेशनात 21 मार्च हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दिवशी समाजाच्या विविध स्तरावर विविध कार्यक्रमांचं, कवी संमेलनाचं आयोजन केलं जातं. 

22 मार्च : गुढीपाडवा 


Important Days in March 2023 : 'जागतिक महिला दिन' आणि 'होळी'सह मार्च महिन्यातील हे आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.  शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार, काही जण या दिवशी सोनं खरेदी करतात, काही नवीन कार घेतात तर काही जण नवीन व्यवसायाला प्राधान्य देतात. 

22 मार्च : चैत्र नवरात्रारंभ 

यावर्षी 22 मार्च, पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवसापासून शोभन नावाचा संवत्सरही सुरू होईल. यंदा चैत्र नवरात्रीला देवीचं वाहन जहाज असेल, त्यामुळे यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरी केली जाते. दुसरी नवरात्र जून-जुलै महिन्यात, तिसरी सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथी नवरात्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरी केली जाते. यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चैत्र नवरात्र ही सत्ययुगात सर्वात प्रसिद्ध आणि प्रचलित होती, या दिवसापासून हे युग सुरू झाले असे मानले जाते. म्हणून संवताचा प्रारंभ चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीपासून होतो.

23 मार्च : जागतिक हवामान दिन

हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठेवली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली.

24 मार्च : World Tuberculosis (TB) Day

इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला आणि त्याला दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.

27 मार्च : जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day)

27 मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो.

30 मार्च : श्रीराम नवमी 

रामनवमीचा सण देशभरात भगवान श्री रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात असे सांगितले जाते की भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला झाला होता, हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रथेनुसार श्री रामाची पूजा केली जाते. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 

31 मार्च : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 

1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गृहित धरलं जातं. या दरम्यान 31 मार्च रोजी सर्व आर्थिक व्यवहार बंद करून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक व्यवहार सुरु केले जातात. यामध्ये आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व संस्था, बॅंका, व्यापारी वर्ग यांचा समावेश असतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in February 2023 : प्रेमाचा महिना, मराठी मातृभाषेचा दिन आणि अनेक फेस्टिव्हल्सची मांदियाळी; 'ही' आहे महत्त्वाच्या दिवसांची यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget